Goa Murder Case: राय येथील खून प्रकरण; पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या दुसऱ्याही संशयिताला अटक

Goa Crime News: शनिवारी रात्री ही घटना घडल्याचे तपासात समोर आले आहे. खोलीतून बाहेर आलेल्या रक्तामुळे शेजाऱ्यांना काहीतरी अनुचित घडल्याचे समजले.
Goa murder case Raia
Crime news from GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सोनारवाडा सातेमळ-राय येथे ओडिशाच्या खगेश्वर साबर या व्यक्तीचा खून झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणातील फरार दुसऱ्या संशयिताला देखील मायणा कुडतरी पोलिसांनी अटक केली आहे. दारुच्या नशेत ही घटना घडल्याचे प्राथमिक तपास समोर आले आहे.

मायणा-कुडतरी पोलिसांनी सुरुवातीला सशिबंत बिभीषण मांझी ऊर्फ लंबू (वय ४२ वर्षे) याला अटक केली होती. दरम्यान, आता दुसरा संशयित रबी माझी (वय २८ वर्षे) यालाही अटक करण्यात आली आहे. तिघेजण खोलीत दारू पीत बसले होते. दारुच्या नशेत त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यातच खगेश्वर याच्यावर हल्ला केल्याने त्याच मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.

Goa murder case Raia
Kala Academy:"गोविंद गावडेंना पर्वा नाही" राजदीप नाईक यांचा थेट आरोप; मुख्यमंत्र्यांकडे मदतीची याचना

शनिवारी रात्री ही घटना घडल्याचे तपासात समोर आले आहे. खोलीतून बाहेर आलेल्या रक्तामुळे शेजाऱ्यांना काहीतरी अनुचित घडल्याचे समजले. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. दारुच्या नशेतच ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात असून, यातच खगेश्वर साबर याचा मृत्यू झाला, अशी माहिती मिळाली आहे.

Goa murder case Raia
Margaon: दक्षिण गोव्यात भिकाऱ्यांचा उपद्रव वाढला; भीक मागण्यासाठी मुलांचा वापर, चालू वर्षात 41 जणांवर कारवाई

दरम्यान, या घटनेनंतर संशयित लंबू आणि रबी पलायन करण्याच्या तयारीत होते. त्यानुसार पोलिसांनी दोघांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली. पोलिसांनी लंबू याला मडगाव रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली तर रबी याला बांबोळी परिसरातून अटक केली. दोघांचीही पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com