Goa Dainik Gomantak
गोवा

Goa News : भाजप सरकार धूळफेक करणारे : अमित पाटकर

Goa News : गोव्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा ‘इंडिया’ आघाडीच जिंकणार आहे, असा विश्‍‍वास काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी व्‍यक्त केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News :

कुडचडे, केंद्र व राज्‍य सरकारकडून फक्त आश्‍‍वासनांची खैरात केली जाते, पण ही आश्‍‍वासने पूर्ण केली जात नाहीत. त्‍यामुळे हे धूळफेक करणारे सरकार असल्‍याचे सिद्ध झाले आहे. अशा फसव्या सरकारवर जनता विश्‍‍वास ठेवणार नाही.

गोव्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा ‘इंडिया’ आघाडीच जिंकणार आहे, असा विश्‍‍वास काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी व्‍यक्त केला.

कुडचडे मतदारसंघात ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी रविवारी प्रचार दौरा करताना मतदारांच्‍या गाठीभेटी घेण्‍यावर भर दिला. यावेळी पाटकर बोलत होते.

दक्षिण जिल्हा अध्यक्ष ज्‍युलिओ डिसोझा, गटाध्यक्ष पराग सबनीस, काँग्रेस कार्यकर्ते मनोहर नाईक, डॉम्‍निक फर्नांडिस, आम आदमीचे जेम्स फर्नांडिस, गाब्रियल फर्नांडिस, माजी नगरसेवक सुधाकर नाईक, गट समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्‍थित होते.

कुडचडे रेल्वेस्थानकाजवळून प्रचार मोहिमेला सुरुवात केल्यानंतर संपूर्ण बाजार परिसरात नागरिक तसेच व्यापारी लोकांच्‍या भेटी घेऊन त्‍यांना काँग्रेसची बाजू अमित पाटकर व कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी पटवून दिली.

यावेळी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचारात उत्साह निर्माण केला. तसेच मतदारांना भाजप सरकार कसे जनहितविरोधी आहे, हे सांगण्‍याचा प्रयत्‍न केला.

सरकारवरील राग मतदानातून दिसणार : विरियातो

दक्षिण गोव्यात ‘इंडिया’ आघाडी जिंकणार ही काळ्‍या दगडावरची रेघ आहे. तसेच उत्तर गोवाही जिंकून ‘इंडिया’ आघाडी गोव्यात इतिहास घडविणार आहे. मोदी सरकारवरील राग मतदार प्रत्यक्ष मतदान करून व्यक्त करतील. जनतेच्या भावना जाणून घेताना डबल इंजीन सरकारला यावेळी जनता घरी पाठविणार आहे.

गेल्या दहा वर्षांत जनतेची पिळवणूक करताना पेट्रोल-गॅस दरवाढ, कडधान्य दरवाढ, खाणबंदी, नोकर भरतीची खोटी आश्वासने तसेच अन्‍य घातक निर्णय घेऊन जनतेला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्याचा राग मतदानातून दिसून येईल, असे कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.

राज्‍यातील खनिज व्यवसाय नष्ट करून जनतेला देशोधडीला लावणाऱ्या भाजप सरकारने खाण घोटाळेबाजांना ‘पावन’ करून घेतले आहे. भरमसाठ महागाई वाढविणाऱ्या या सरकारला देशातील जनता पुन्‍हा संधी देणारच नाही. यावेळी देशात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्‍थापन होणार आहे.

- अमित पाटकर,

काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'आम्ही पुढच्या वेळी फुकेटला जाऊ',पर्यटकांचा गोव्याला रामराम, टॅक्सी माफियांची दादागिरी; Video Viral

शेतकऱ्यांसमोर पुन्‍हा एकदा संकट! उरले सुरले पीकही हातचे जाण्याची भीती; म्हैसाळ धरण दुसऱ्यांदा भरले

Super Cup 2025: गतविजेत्या FC Goa चा विजय! जमशेदपूर एफसीला नमविले; सिव्हेरियोचा भेदक गोल

Vasco: '..वेळप्रसंगी रस्त्यावर येऊ'! वास्कोतील टॅक्सीचालक आक्रमक; खासगी बसचालकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी

Konkani Language: 'सरकारी नोकरीसाठी ‘कोकणी’ची अट नको'! फोंड्यात धरणे आंदोलन; मराठी राजभाषा निर्धार समितीची मागणी

SCROLL FOR NEXT