Dual Citizenship: "परदेशातील गोमंतकीयांना न्याय द्या"! आमदार सरदेसाईंनी केली दुहेरी नागरिकत्‍वाची मागणी Watch Video

Vijai Sardesai : विदेशात काम करणाऱ्या गोमंतकीयांना दुहेरी नागरिकत्‍व देण्‍यात यावे, अशी मागणी आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.
Vijai sardesai demand, Goa citizens working abroad
Vijai sardesai demand, Goa citizens working abroadDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍य सरकारने नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध करून न दिल्‍यामुळेच अनेकांना रोजगारासाठी पोर्तुगालसह विविध देशांमध्‍ये जावे लागत आहे. अशा विदेशात काम करणाऱ्या गोमंतकीयांना दुहेरी नागरिकत्‍व देण्‍यात यावे, अशी मागणी आमदार तथा गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.

पणजीतील कार्यालयात गुरुवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोव्‍यात रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध नसल्‍यामुळे अनेक गोमंतकीयांनी गोवा सोडला. अनेक देशांमध्‍ये जाऊन ते काम करीत आहेत. परंतु, ते आपली पाळेमुळे विसरलेले नाहीत.

गोव्‍याशी त्‍यांचे असलेले भावनिक नाते कायम आहे. विदेशात राहूनही त्‍यांनी आपले गोंयकारपण आणि गोव्‍याची ओळख जपलेली आहे. तरीही त्‍यांना दुहेरी नागरिकत्‍व नाकारण्‍यात येत असल्‍यामुळे त्‍याचे परिणाम त्‍यांच्‍या कुटुंबांवर होत आहेत.

Vijai sardesai demand, Goa citizens working abroad
Citizenship Migration: 15 लाख भारतीयांनी सोडले नागरिकत्व‌! गोव्यातील आकडेवारी किती? वाचा

त्‍यामुळे केंद्र सरकारने गोव्याचा इतिहास लक्षात घेऊन पोर्तुगीज नागरिकत्व असलेल्या गोमंतकीयांसाठी विशेष धोरण तयार करावे आणि दुहेरी नागरिकत्‍व बहाल करावे, असे सरदेसाई म्‍हणाले.

Vijai sardesai demand, Goa citizens working abroad
Dual Citizenship: ''भारत सरकारनेही इतर देशांसारखा दुहेरी नागरिकत्‍व कायदा लागू करावा''; राजकीय विश्लेषक आणि नेत्‍यांची मागणी

दरम्‍यान, विदेशात असलेल्‍या गोमंतकीयांना दुहेरी नागरिकत्व दिल्याने गोवा आणि परदेशातील गोमंतकीय यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील आणि केवळ आर्थिक कारणामुळे स्थलांतर करण्यास भाग पडलेल्या गोमंतकीयांना न्याय मिळेल, असेही त्‍यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com