Nitin Nabin Goa Visit: ‘भाजप’कडून जय्यत तयारी! कसा होणार 'नितीन नवीन' यांचा गोवा दौरा? वाचा सविस्तर..

Goa BJP Melava: भाजपने शनिवारी ताळगाव येथील समाज सभागृहात सकाळी १० वा. होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
nitin nabin goa visit
nitin nabin goa visitDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजपने शनिवारी ताळगाव येथील समाज सभागृहात सकाळी १० वा. होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. गावागावांतून शेकडो कार्यकर्ते या मेळाव्याला येतील, असे गृहित धरून नियोजन केले आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह मेळाव्याच्या ठिकाणाची आणि एकंदरीत व्‍यवस्थेची पाहणी केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच राज्याच्या दौऱ्यावर येत असल्याने एकंदरीत आयोजनात उत्साह आहे.

विधानसभा निवडणुकीचे रणशिंग या मेळाव्यात फुंकले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी गावागावांतून कार्यकर्ते येतील. यासाठी मंडळ पातळीवर गेले आठवडाभर तयारीच्या बैठका घेण्यात येत होत्या. त्यानंतर जिल्हा पातळीवर आढावा घेण्यात आला आहे. कोणासोबत किती कार्यकर्ते येतील याचे पक्के नियोजन करण्यात आले आहे.

तत्पूर्वी उद्या भाजप कार्यालयात होणाऱ्या बैठकांवेळी कोण कधी उपस्थित असेल याचेही नियोजन करण्यात आले असून संबंधितांना कार्यालयातून तसे निरोपही देण्यात आले आहेत.

nitin nabin goa visit
Nitin Nabin Goa Visit: भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष प्रथमच गोवा दौऱ्यावर! 2027 साठी रणनीती होणार स्पष्ट

शुक्रवार, ३० जानेवारी

सकाळी ११ वा. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य स्वागत

सकाळी ११.४५ वा. भाजप कार्यालयात जंगी स्वागत

दु. १२ वा. कार्यालयात गाभा समिती बैठक

दु. १.३० वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व कुटुंबीयांसोबत भोजन

दु. ३ वा. आमदारांसोबत कार्यालयात बैठक

सायं. ४.३० वा. वेर्णाच्या महालसा देवीचे दर्शन

सायं. ५.३० वा. मडगाव कार्यालयात कार्यकर्ता संवाद

सायं. ६.३० वा. पणजी कार्यालयात मोर्चा अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांशी संवाद

सायं. ७.३० वा. रालोआ (मगो) नेत्यांसोबत बैठक

nitin nabin goa visit
Nitin Nabin Goa Visit: भाजप नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष 'नितीन नवीन' येणार गोवा दौऱ्यावर, गाभा समितीची घेणार बैठक

शनिवार, ३१ जानेवारी

सकाळी ९ वा. चिंबल येथील भाजप कार्यालय बांधकामास भेट

सकाळी १० वा. मिरामार पर्रीकर स्मृती स्थळाला भेट

सकाळी १०.३वा. ताळगाव येथे कार्यकर्ता मेळावा

दु. १.३० वा. पिळर्ण येथे उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षांच्या निवासस्थानी जेवण

सायं. ४.३० वा. म्हापसा कार्यालयात भेट व कार्यकर्ता संवाद

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com