Davorlim Saw Mill Fire: दवर्लीत भीषण आग! सॉ मिल जळून खाक; 50 लाखांच्या नुकसानीचा अंदाज

Gaulaxmi Saw Mill Fire: येथील गौलक्ष्मी सॉ मिलला रात्री उशिरा भीषण आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आगीत लाकूड साठा, यंत्रसामग्री जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Gaulaxmi Saw Mill fire, Davorlim saw mill fire
Gaulaxmi Saw Mill fire, Davorlim saw mill fireDainik Gomantak
Published on
Updated on

दवर्ली: येथील गौलक्ष्मी सॉ मिलला रात्री उशिरा भीषण आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आगीत लाकूड साठा, यंत्रसामग्री जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मिलचे मालक यांनी या आगीत सुमारे ५० लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Gaulaxmi Saw Mill fire, Davorlim saw mill fire
Goa Night Club Fire: 'फायर अलार्म' वाजलाच नाही'! आर्थिक फायद्यासाठी लुथरा बंधूंचा लोकांच्या जीवाशी खेळ; सरकारी पक्षाचा गंभीर आरोप

आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोळ पसरले होते, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही काळासाठी वाहतूक आणि आसपासच्या व्यवसायांवरही परिणाम झाला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Gaulaxmi Saw Mill fire, Davorlim saw mill fire
Goa Night Club Fire: 'क्लबमध्ये ‘पायरो’ पेटवणारे अजूनही मोकाटच!', लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; 5 फेब्रुवारीला फैसला

अधिकृत तपासानंतरच कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे मिलचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून कामगार आणि मालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com