Goa Students Exam Canva
गोवा

Goa Education: विद्यार्थ्यांसाठी नवी अपडेट! मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात होणार परीक्षा; उन्हाळ्यामुळे शाळांच्या वेळापत्रकात होणार बदल

Goa School Exam Schedule: यंदा माध्यमिक विद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा दहावीच्या परीक्षेनंतर म्हणजेच मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात होतील.

Sameer Panditrao

Goa secondary school students' annual exams update

पणजी: यंदा माध्यमिक विद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा दहावीच्या परीक्षेनंतर म्हणजेच मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात होतील, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले.

झिंगडे म्हणाले की, परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणीसाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागेल. त्यामुळे वार्षिक परीक्षांचे निकाल २९ एप्रिलपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश शाळांना दिले आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू होईल. त्यावर या प्रक्रियेचा कोणताही परिणाम होणार नाही.

राज्यात अद्याप आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचे धोरण लागू असल्याने आठवीपर्यंतचे विद्यार्थी पुढील वर्गात जातील. नववीचे विद्यार्थीही पुढील वर्गात जातील. मात्र, नापास झाल्यास त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षा असेल. त्यामुळे याविषयी संभ्रम असण्याचे काहीच कारण नाही.

एप्रिलमध्ये ११.३० पर्यंतच शाळा

राज्यात यंदा पहिल्यांदाच एप्रिलमध्ये इयत्ता सहावी ते दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नवीन शिक्षण धोरणानुसार जो कालावधी पूर्ण करायला हवा, त्याची पूर्तता होईल. एप्रिल महिन्यातही विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार पुरविण्यात येईल. एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात उष्मा असतो. त्यामुळे सकाळी ११.३० वाजेपर्यंतच शाळा भरतील. उष्माच्या परिणाम माध्यान्ह आहारावर होणार नाही, याचीही काळजी घेण्यात येईल, असे झिंगडे यांनी स्पष्ट केले.

ऑन जॉब प्रशिक्षणही मिळणार

यापूर्वी अकरावीच्या व्होकेशनल विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्यात ऑन जॉब प्रशिक्षण देण्यात येत होते; परंतु यंदा नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये सुरू होणार असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, ऑन जॉब प्रशिक्षण हा अकरावीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमातील अविभाज्य घटक असल्याने तो सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे गोवा शिक्षण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

SCROLL FOR NEXT