Panaji Smart City Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: स्मार्ट सिटीची कामे पणजीवासीयांसाठी ठरतायेत डोकेदुखी; खोदकामांमुळे वाहतुकीवर परिणाम!

Panaji Smart City: पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांमुळे शहरातील वाहतुकीवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे शहरात वाहनधारकांना वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

Manish Jadhav

पणजी: पणजीतील स्मार्ट सिटीच्या कामांमुळे शहरातील वाहतुकीवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे शहरात वाहनधारकांना वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर सुरु असलेल्या खोदकामामुळे त्यात भर पडली आहे.

पणजीवासीय हैराण!

दरम्यान, पणजीत खोदलेले रस्तेच पुन्हा पुन्हा खोदले जात आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर होणारा परिणाम तसेच धूळ प्रदूषणामुळे लोक हैराण आहेत. मागील काही वर्षांपासून स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्त्यांचे खोदकाम सुरुच आहे.

गोवा (Goa) हे राज्य देशाची पर्यटन राजधानी म्हणून ओळखला जातो. देशविदेशातील पर्यटक नियमितपणे गोव्याला भेट देत असतात. याच गोव्याच्या राजधानीची अवस्था मात्र अलीकडच्या काळात अगदी वाईट झाली आहे. या कामांमुळे पणजीतील रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी कामे सुरु आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी एकाचवेळी रस्ते खोदून ठेवले गेले आहेत. त्याचा परिणाम पणजी शहरातील वाहतुकीवर झाला आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत असून आता विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु झाल्याने पणजीतील वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT