Power Cut: दक्षिण गोव्यात पाच तास अंधार; शेल्डे उपकेंद्रातील तीन ट्रान्सफॉर्मर एकाचवेळी ट्रिप

South Goa Electricity News: शेल्डे येथील वीज उपकेंद्रातील तीन ट्रान्सफॉर्मर एकाचवेळी ट्रिप झाल्याने कुशावतीसह दक्षिण गोव्यातील अनेक भागांचा वीजपुरवठा बुधवारी सकाळी ७.३० वाजता खंडित झाला.
South Goa Electricity News
Power CutDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: शेल्डे येथील वीज उपकेंद्रातील तीन ट्रान्सफॉर्मर एकाचवेळी ट्रिप झाल्याने कुशावतीसह दक्षिण गोव्यातील अनेक भागांचा वीजपुरवठा बुधवारी सकाळी ७.३० वाजता खंडित झाला.

यामुळे जनजीवन आणि व्यावसायिक व्यवहारांवर परिणाम झाला. वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाच तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारी १ वाजता वीजपुरवठा पूर्ववत केला. मात्र, बिघाडाचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते.

South Goa Electricity News
Goa Human Trafficking: पीडित महिलांना दोष नको; मानवी तस्कर, दलाल आणि शोषणाच्या संपूर्ण साखळीवर कारवाई करा – एआरझेड

बिघाड कशामुळे?

वीज खात्याचे अधीक्षक अभियंते राजीव सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेल्डे येथे कावळा वीजवाहिनीवर बसल्याने दोन वाहिन्या एकमेकांच्या संपर्कात आल्या असाव्यात. तसेच वेर्णा येथील वीजवाहिनीच्या केबल्स कापल्यानेही बिघाड झाला असावा. मात्र, कारण स्पष्ट झालेले नसून चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.