शिरोडा : कोरोना महामारीच्या (Covid -19) काळात डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कामगारांनी रुग्णांना जीवदान (save life) देण्यासाठी केलेले अथक प्रयत्न हे न विसरण्यासारखे आहेत. म्हणूनच अनेकांचे प्राण वाचले. कोरोना योद्धे डॉक्टरांचे समाजावर मोठे ऋण आहे. डॉक्टरांनी आपल्या पेशाशी प्रामाणिक राहून दुसऱ्यांना जगवण्यासाठी सतत कार्यरत राहावे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले. शिरोडा गावासाठी आणखी रुग्णवाहिका (Ambulance) दिल्या जातील, असेही राणे म्हणाले.
आरोग्यखाते आणि प्राथमिक आरोग्यकेंद्र शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार २२ रोजी शिरोडा येथील प्राईड हॉलमध्ये आयोजित केलेल्या कोविड योद्धे डॉक्टर आणि परिचारिका कर्मचाऱ्यांच्या गौरव समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्यमंत्री राणे बोलत होते.
यावेळी शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर, शिरोड्याचे सरपंच अमित शिरोडकर, पंचवाडी सरपंच क्रिस्तेव डिकॉस्ता, बेतोडा निरंकालचे सरपंच विशांत गावकर, शिरोडा भाजप मंडळ अध्यक्ष सूरज नाईक, सरचिटणीस अवधूत नाईक, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जोस डी. सिल्वा, डीआयओ डॉ. राजेंद्र बोरकर, शिरोडा आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. सुनिता रेडकर, डॉ. अक्षया सामंत यांच्यासह अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आमदार सुभाष शिरोडकर यांनी कोविड योद्धे डॉक्टर परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. विश्वजित राणे यांच्या हस्ते पारंपरिक समई प्रज्वलित करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. राणे आणि शिरोडकर यांच्या हस्ते डॉ. सुनिता रेडकर, डॉ. अक्षया पावसकर, डॉ. रिचा कुलासो, डॉ. विजयंत नाईक, डॉ. सिद्धान्त शेट, डॉ. रोहन फर्नांडिस, डॉ. शारदा वायंगणकर, डॉ. स्वेता नाईक, डॉ. तृप्ती प्रभू अनवेकर, डॉ. क्रिस्पी मिशेल फर्नांडिस, डॉ. फ्राजूल डोराडो, डॉ. उमेश मोपकर, डॉ. बिंदिया शिरोडकर आणि परिचारिका व कर्मचारीवर्ग यांचा शाल, श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. आरोग्य संचालक डॉ. जोस डिसिल्वा यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. सुनिता रेडकर यांनी स्वागत केले. तर डॉ. अक्षया पावसकर यांनी आभार मानले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.