Lotulim Gram Sabha Dainik Gomantak
गोवा

Lotulim Gram Sabha: 'ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे तरुणांना जीव गमवावा लागतोय'; लोटली ग्रामसभेत सनबर्नला कडाडून विरोध

Sunburn Festival: यंदाचा सनबर्न फेस्टिव्हल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सनबर्न आयोजनाच्या ठिकाणावरुन राज्यात सध्या राजकीय वादंग निर्माण झाला आहे.

Manish Jadhav

यंदाचा सनबर्न फेस्टिव्हल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सनबर्न आयोजनाच्या ठिकाणावरुन राज्यात सध्या राजकीय वादंग निर्माण झाला आहे. विरोधक सातत्याने या मुद्यावरुन सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतायेत. दरम्यान, आज (11 ऑगस्ट) लोटली ग्रामसभेने सनबर्न फेस्टिव्हलला कडाडून विरोध केला. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे राज्यातील तरुणांना जीव गमवावा लागत असल्याचे सांगत सनबर्नवर बंदी घालण्याची मागणी ग्रामस्थांनी सरकारकडे केली. याशिवाय, त्यांनी रोमी कोकणीला समान दर्जा मिळावा यासाठीही ग्रामसभेत ठराव मंजूर केला.

लोटली वेर्णा पठारावर सनबर्न उत्सवाचे आयोजन आणि कचरा हाताळणी प्रकल्प बांधण्याचा प्रस्ताव तसेच रोमी कोकणी लिपीला अधिकृत मान्यता आणि समान दर्जा देण्याबाबतचे 5 ग्रामस्थांनी पत्र लिहिले होते. या पत्राच्या आधारे दैनिकात नोटिस जारी केली होती. अशी माहिती सरपंच सनफ्रान्सिस्को फर्नाडिस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. तसेच, लोकांना सनबर्न नको असेल तर माझाही विरोध असेल, असेही ते म्हणाले होते.

काल (10 ऑगस्ट) आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी सनबर्नच्या आयोजकांविरुद्ध तक्रार नोंदवली. पालेकर यांनी यावेळी सरकारकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता जोरकसपणे तिकीट विक्री सुरु असल्याचा आरोप केला. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत राजधानी पणजी येथील पोलिस स्थानकात या आयोजकांविरुद्ध रितसर अशी पोलिस तक्रार नोंदवली. पालेकर यांनी यावेळी आम आदमी पक्षाचा अशा प्रकारच्या तिकीट विक्रीला विरोध असल्याचे सांगितले.

दरवर्षी सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजन उत्तर गोव्यातील वागतोर येथे आयोजन केले जाते. मात्र यंदाचे सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजनाचे ठिकाण दक्षिण गोवा असल्याचे आयोजकांकडून घोषणा करताच विरोधाची लाट उसळली. दक्षिण गोव्यातील (South Goa) राजकीय पुढाऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला. एवढचं नाहीतर दक्षिण गोव्यातील ग्रामसभांनी सनबर्नच्या विरोधात ठराव मंजूर करुन आपला विरोध दर्शवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT