Sunburn Festival : सनबर्नमुळे गोव्याला जागतिक मान्यता हे मुख्यमंत्र्यांचे विधान अत्यंत दुर्दैवी : अमित पाटकर

Sunburn Festival 2024 : शाखा प्रशिक्षित सावंतांनी इतिहास वाचावा
Amit Patkar
Amit Patkar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी, सनबर्नसारख्या ‘ड्रग फेस्टिव्हल’मुळे गोव्याला जागतिक मान्यता मिळाल्याचे श्रेय शाखा प्रशिक्षित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी पुन्हा एकदा डॉ. प्रमोद सावंत यांना मूर्खपणाची विधाने करण्यापूर्वी इतिहासाची पुस्तके वाचण्याचा सल्ला देतो, असा टोला काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी लगावला आहे.

पाटकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भाषण आणि गोव्याच्या विकासात काँग्रेसचे योगदान नाही, या केंद्रीयमंत्री किरण रिजिजू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी भाजपला गोव्यातील माफियांचे प्रवर्तक म्हटले आहे.

गोव्यात चोगम रिट्रीट १९८३ मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन काँग्रेस सरकारने आयोजित केल्याने गोव्याला जागतिक क्षितिजावर नेले. गोव्याची संस्कृती आणि वारसा यांना जागतिक ओळख आहे. भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गृहपाठ करून सनबर्न फेस्टिव्हलसारख्या ड्रग फेस्टिव्हलला श्रेय देणे बंद करावे.

Amit Patkar
G 20 मध्ये आलेल्या पाहुण्यांसाठी दिली जातीय 'ही' खास डिश , तुम्हीही नोट करा रेसिपी

नीती आयोगाच्या बैठकीत खोटी माहिती

नीती आयोगाच्या बैठकीत दिशाभूल करणारी वस्तुस्थिती मुख्यमंत्री सावंत यांनी मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दक्षिण गोवा लोकसभा निवडणूक प्रचार सभेचे ठिकाण सांकवाळ येथील उघड्यावर शौचाच्या ठिकाणापासून काही मीटर अंतरावर होते, परंतु मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या भाषणात गोवा हे हागणदारी मुक्त असल्याचा दावा केला आहे, हा सर्वात मोठा विनोद असल्याचे अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa CM Pramod Sawant accident help
Velsao Villagers Delegation Meets South Goa Collector
Yuri Alemao Vijay Sardesai Dispute
Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com