Goa  Dainik Gomantak
गोवा

Dialysis Patients Goa: राज्यात डायलेसिस रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक : मुख्यमंत्री डॉ. सावंत

Dialysis Patients Goa: योग्य आहार व व्यायाम करण्याचे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

Dialysis Patients Goa

राज्यात इस्पितळांमध्ये डायलेसिससाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

इस्पितळांमध्ये डायलेसिस यंत्रणा वाढवण्यात आली आहे, तरी रुग्णांना उपचार घेण्यासाठी वाट पाहावी लागते, ही चिंतेची बाब आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मारिओ सिक्वेरा लिखित रोड टू लॉँजीटीव्हीटी या पुस्तकाच्या प्रकाश सोहळ्यात बोलताना व्यक्त करून योग्य आहार व व्यायामावर भर देण्याचे आवाहन केले.

राज्यात वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात एकच डायलेसिस केंद्र होते. त्यावेळी डायलेसिसची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा कमी होती. मात्र ही संख्या गेल्या काही वर्षात मोठ्या झपाट्याने वाढू लागली आहे. राज्यातील बारा तालुक्यात डायलेसिस केंद्र आहेत तरीदेखीलती कमी पडत आहे.

या रुग्णांना उपचार मिळवण्यासाठी क्रमांक लावण्याची पाळी येत आहे ही गंभीर बाब आहे. अनेकदा काही रुग्णांचे नातेवाईक आपल्याला फोन करून रुग्णांना लवकर डायलेसिस करावे, यासाठी विनंती करत आहेत. डायलेसिस हा आजार वेगाने वाढ आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. यावेळी पर्यावरण मंत्री ॲलेक्स सिक्वेरा, प्रकाशक शंतनू रे चौधरी उपस्थित होते.

प्रत्येकाने आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे नित्याची गरज आहे. काय खावे, किती खावे तसेच काय खाऊ नये व कधी खावे याची माहिती करून घेणे गरजेचे आहे. योग्य आहारासोबतच वेळेवर व्यायाम व योगासने करणे देखील महत्वाचे आहे. काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांची मी भेट घेतली, तेव्हा त्यांनी नुकतीच शंभरी ओलांडली होती. त्यांनी या वयातही आरोग्य चांगल्या प्रकारे सांभाळले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून तंदुरुस्तीमागील काही बारकावे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मानसिक स्वास्थ्य हवे!

शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य आहार व योगासने खूप गरजेचे आहे. धावपळीच्या जीवनात या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येकाला अधिकाधिक वर्षे जगण्याची इच्छा असते. शारीरिक व्यायामासोबत मानसिक स्वास्थ्य टिकवणे देखील महत्त्वाचे आहे. मानसिक स्वास्थ्य नसेल, तर ताण तणाव वाढतो.

यामुळे मधुमेह, हृदय विकार, अर्धांग वायूचा झटका असे विकार जडत आहेत, असे असले तरी हे योग्य व्यायाम आणि मानसिक स्वास्थ्य असेल तर टाळता येणे शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश, मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT