Foundation Stone Program of Caves of Pavdava's In Lamgao, Bicholim, Goa. On 03 Aug, 2021. Tukaram Sawant / Dainik Gomantak
गोवा

Goa: "पांडवांची गुहा" सौंदर्यीकरण कामाची पायाभरणी

डिचोलीतील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न (Goa)

Tukaram Sawant

Bicholim: लामगाव येथील ऐतिहासिक वारसा स्थळ (Historic heritage site) असलेल्या पांडवकालीन गुहेसह डिचोलीतील (Bicholim) अन्य ऐतिहासिक स्थळांचा विकास करून पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण प्रयत्न करणार. त्यासाठी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) यांच्याशी या विषयावर चर्चा करणार. असे डिचोलीचे आमदार आणि गोवा राज्याचे सभापती राजेश पाटणेकर (Bicholim MLA & Goa Assembly Speaker Rajesh Patanekar) यांनी स्पष्ट केले आहे. डिचोली पालिका क्षेत्रातील लामगाव येथील "पांडवांची गुहा" (Pandava's Cave) या पांडवकालीन ऐतिहासिक स्थळाचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. या कामाची पायाभरणी केल्यानंतर सभापती श्री.पाटणेकर बोलत होते. पायाभरणी सोहळ्यावेळी नगराध्यक्ष कुंदन फळारी, सार्वजनिक बांधकाम खात्याची सहायक अभियंता रश्मी मयेकर, प्रभागाचे नगरसेवक सुदन गोवेकर यांच्यासह विजयकुमार नाटेकर, रियाज बेग, निलेश टोपले, दीपा शेणवी - शिरगावकर, दीपा पळ आणि अनिकेत चणेकर उपस्थित होते. अन्य मान्यवरांमध्ये आनंदराव देसाई, मलबाराव देसाई, शरदचंद्र देसाई, परेश कडकडे, महेश कडकडे, पांडुरंग पोपकर आदी नागरिकांचा समावेश होता.

विकासकामांना चालना

सरकारच्या सहकार्याने लामगाव प्रभागातील विकासकामांना चालना मिळत असल्याचे स्थानिक नगरसेवक सुदन गोवेकर यांनी सांगून, या वर्षभरात दिड कोटी खर्चाचे विकास प्रकल्प पूर्णत्वास येईल. असा विश्वास व्यक्त केला. पांडवांची गुहा परिसरातील तळ्यात गणपती विसर्जनावेळी निर्माण होणारी अडचण लक्षात घेवून तळीवर जाणाऱ्या वाटेवर पेव्हर्स बसविण्यात येणार असल्याचे श्री. गोवेकर यांनी सांगून, सौंदर्यीकरण कामासाठी जमिन दिलेल्या देसाई, कडकडे आणि पोपकर कुटुंबांनाही त्यांनी धन्यवाद दिले. स्वागत विजयकुमार नाटेकर यांनी केले. नेहाल गोवेकर यांनी आभार मानले.

58 लाख खर्चून सौंदर्यीकरण

लामगाव येथील प्राचिन आणि ऐतिहासिक गुहा आहे. "पांडवांची गुहा" असे या गुहेला ओळखण्यात येते. अधूनमधून या गुहेला देशीसह विदेशी पर्यटकही भेट देतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि तिचे संवर्धन होण्यासाठी या गुहेचे सौंदर्यीकरण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सुमारे 58 लाख रुपये खर्च करून हे विकसित काम करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

SCROLL FOR NEXT