गोवा महाराष्ट्र सीमेवरचा किरणपाणी-आरोंदा नाका खुला

Goa: किरणपाणी–आरोंदा व न्हयबाग–सातार्डा हे दोन्ही नाके पूर्णपणे 14 मे पासून सील केले होते.
Goa Curfew
Goa CurfewDainik Gomantak

मोरजी: किरणपाणी आरोंदा चेक नाक्यावर आता महाराष्ट्रातुन (Maharashtra) गोव्याला आणि गोव्यातून (Goa) महाराष्ट्रातील हद्दीत ये जा करणाऱ्या नागरिकांना सीमेवर अडवण्यात येणार नाही. मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी आरोंदा किरणपाणी चेक नाक्यावर कार्यकर्त्यांसहित 3 ऑगस्टला रोजी धडक दिली. योग्य पद्धतीने सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे चर्चा केल्यानंतर हा चेकनाका सर्वांसाठी खुला करण्यात आला. (Kiranpani check post goa maharashtra border is started for transportation)

किरणपाणी–आरोंदा व न्हयबाग–सातार्डा हे दोन्ही नाके पूर्णपणे 14 मे पासून सील केले होते. त्यामुळे कुणालाच आत बाहेर कोरोना चाचणीचा नकारात्मक दाखला किंवा ई-पास असला तरीही प्रवेश दिला जात नव्हता, हा प्रकार 14पासून सुरु केला व दोन्ही नाक्यावर पोलीस तैनात करण्यात आले होते. दोन्ही नाक्याला तातडीने पोलीस अधीक्षक पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी भेट देवून पोलीसाना महत्वाच्या सुचना करण्यात आल्या होत्या त्यानुसार चोवीस तास पोलीस बंदोबस्त होता. केवळ पत्रादेवी मुख्य नाका खुला होता त्याच नाक्यावरून वाहतूक ये जा केली जात होती.

मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे
मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे Dainik Gomantak

किरणपाणी – आरोंदा आणि सातार्डा न्हयबाग हे दोन्ही नाके सर्व प्रकारच्या वाहनासाठी आणी नागरिकाना ये जा करण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत 14 पासून बंद केले होते. केवळ राष्ट्रीय महामार्ग 66 वरील पत्रादेवी हाच चेक नाका सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी नागरिकाना प्रवेश देण्यासाठी खुला होता. याच नाक्यावर राज्यातून बाहेर जाताना ई पास तर बाहेरून राज्यात येणाऱ्याना कोरोना नकारात्मक दाखला घेवून यावा लागेल तरच प्रवेश दिला जाईल. मात्र हे दोन्ही परवाने असले तरीही किरणपाणी व न्हयबाग या नाक्यावरून कुणालाच येता जाता येणार नव्हते .

या घटनेमुळे वाहतूकदार व कामगार जे राज्यात,आरोंदा शिरोडा, सातार्डा, सातोसे या भागातील नागरिकाना थेट पत्रादेवी नाक्यावर येवूनच त्या त्या भागात नियोजित स्थळी जावे लागत होते. त्यामुळे त्या लोकाना कामानिमिताने जाता येता मोठाच प्रवास करावा लागत होता. केरी, पालये, किरणपाणी हरमल, तेरेखोल या भागातील नागरिक महाराष्ट्र आरोदा शिरोडा या भागात कामानिमित्ताने व्यवसाय निमित्ताने, अत्यावश्यक सेवेसाठी कायदेशीर परवानगी घेवून नागरिक किरणपाणी आरोंदा चेक नाक्यावरून जात येत होते त्याना किमान 30 पेक्षा जास्त किलोमीटर प्रवेश करून पत्रादेवी नाका गाठावा लागत होता. त्यामुळे या लोकांची धांदल होत होती.

Goa Curfew
गोवा सरकारचा राज्याबाहेरून येणाऱ्यांवर 'तिसरा डोळा'

हल्ली कामानिमित्ताने सिंधुदुर्ग भागातील नागरिकाना आरोदा किरणपाणी भागातून प्रवेश देण्याचा प्रकार वाढला होता. मात्र गोव्यातून आरोंदा परिसरात जाणाऱ्यांना प्रवेश दिला जात नव्हता, आम्हाला जर प्रवेश दिला जात नाही तर मग सिंधुदुर्ग भागातील नागरिकाना प्रव्रेश का त्यानाही रोखावे असे संतप्त होवून आमदार दयानंद सोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या आमदारसहित नाक्यावर 3 रोजी धडक दिली.

आमदार दयानंद सोपटे यांनी सिंधुदुर्ग पोलीस तहसीलदार राजाराम म्हात्रे आणि सरपंच सुप्रिया पार्सेकर यांच्याकडे चर्चा करून हे चेकनाके दोन्ही राज्यातील नागरिकाना खुले करण्याविषई निर्णय घेतला . आमदार दयानंद सोपटे यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना न्यायालयाच्या आदेशानुसार ज्यांनी दोन कोरोनाचे डोस घेतले त्याना विना अट प्रवेश देण्याची सुचना असतानाही नाक्यावर नागरिकांची अडवणूक होत होती, आपण सिंधुदुर्ग तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे चर्चा करून आज पासून हे नाके खुले करण्याची मागणी केली ,या पुढे कुणालाही अडवले जाणार नाही असे आमदार सोपटे म्हणाले

आरोंदा सरपंच सुप्रिया पार्सेकर यांनी बोलताना या पुढे या नाक्यावर कुणालाच अडवले जाणार नाही , दोन्ही राज्ये एकमेकावर अवलंबून आहे. मागच्या दोन दिवसापूर्वी आरोग्य सेवेचे कर्मचारी नवीन या ठिकाणी चेक करण्यासाठी आले होते, त्याना वरचे नियम माहित नव्हते, त्याना आम्ही समजावून सांगितले, या पुढे कुणालाच अडवले जाणार नाही असे त्यांनी सांगितले .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com