भांगराळे गोंय अस्मिताय तर्फे कोरोना जागृती मोहिम सुरु केली आहे.  Dainik Gomantak
गोवा

Goa:"एकवटान झुजुया" या कोरोना जागृती व्हिडिओला लाभतो प्रचंड प्रतिसाद

कोरोनाच्या वेळी ज्या योद्ध्यांनी आपला जीव धोक्यात घालुन लोकांना वाचविण्याचे प्रयत्न केले त्यांना अभिवादन करण्यात आले असुन नामवंत उद्योगपती, कलाकार, गायक,समाजसेवक, लेखक यांच्या माध्यमातुन कोरोना दूर ठेवण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मडगाव (Madgaon) येथील भांगराळे गोंय अस्मिताय तर्फे कोरोना जागृती (Covid19 Awareness) मोहिम चालु झाली असुन त्याचाच एक भाग म्हणुन या संस्थेने संस्थापक व अध्यक्ष डॉ. पुर्णानंदच्यारी (Dr. Purnanandachyari) यांनी कोरोना (Covid19) महामारीवर लिहिलेल्या गीताचा व्हिडिओ (Video) निर्मित केला असुन त्याला प्रचंड प्रतिसाद (response) लाभत आहे.

कोरोनाच्या वेळी ज्या योद्ध्यांनी आपला जीव धोक्यात घालुन लोकांना वाचविण्याचे प्रयत्न केले त्यांना अभिवादन करण्यात आले असुन नामवंत उद्योगपती, कलाकार, गायक,समाजसेवक, लेखक यांच्या माध्यमातुन कोरोना दूर ठेवण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये वेगवेगळया घोषणा, पोस्टर्स, चित्रे  जागृतीसाठी दाखविण्यात आले आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनय, संगीत व चलचित्र यांचा चांगल्याप्रकारे मिलाफ करण्यात आला आहे. कोरोनाच्या मानसिक नजरेतुन विजय मिळवुया असा संदेश या व्हिडिओ मार्फत देण्यात आला आहे. या व्हिडिओचे लोकार्पण 15 जुलै रोजी करण्यात आले.  

"आमी जागे जावया, जागोवया कोरोनाच्या संंकटात एकवटान झुजुया" असे या गीताचे सुरुवातीचे बोल असुन मध्ये मध्ये हिंदी व मराठीतुनही गीताचे बोल आहेत. "जागो जगावो कोरोना भगावो" अशी घोषणाही त्यात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपुर्ण देशात व्हायरल होणे गरजेचे आहे असे लोकार्पणाच्या वेळी अनेक वक्त्यांनी मत व्यक्त केले. डॉ. पुर्णानंद च्यारी यांच्या प्रास्ताविका नंतर नाट्यकलाकार राजेश प्रभु यांनी आपले विचार व्यक्त केले. ऑनलाईन माध्यमातुन झालेल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिश अग्नी यांनी केले.

व्हिडिओत उद्योगपती श्रीनिवास धेंपो, सिने कलाकार वर्षा उसगावकर, अशोक फळदेसाई, गायिका हेमा सरदेसाई, सोनिया शिरसाट सिने निर्माता राजेन्द्र तालक,  यांचा समावेश आहे. हा व्हिडिओ बनविताना डॉ. शेखर साळकर व त्यांचे कर्मच्यारी तसेच फातोर्डा पोलिसाचे सहकार्य लाभले. रेनबो सोलर पावर सोल्युशन्सचे या व्हिडिओ निर्मितीसाठी मोलाची मदत मिळाली.

डॉ. पुर्णानंद च्यारी यांची ही संकल्पना असुन गीत त्यानेच लिहिले असुन अक्षय नाईक यांनी संगीत साज चढविला आहे. स्वता डॉ. पुर्णानंद च्यारी, पंकज नमशीकर, बिंदिया वस्त, गौतमी हेदे बांबोळकर यांनी हे गीत गायिले असुन फोटोग्राफी दर्शन लोलयेकर व बबेश बोरकर यांची आहे.

माजी खासदार  नरेंद्र सावईकर यांनी हा व्हिडिओ पाहुन सर्वांनी तो पहावा व त्यातुन जनजागृती करावी असे आवाहन केले आहे. त्यांनी या व्हिडिओ निर्मात्यांचेही अभिनंदन केले आहे. कोरोना महामारी अजुुन संपलेली नाही. त्यामुळे प्रत्येकाने आप आपली जबाबदारीची जाणिव बाळगुन वावरावे असेही सावईकर यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT