Texas  Dainik Gomantak
गोवा

Goa: टॅक्सास कंपनीची उत्पादने 18 राज्यांत उपलब्ध

एन तुलसीयान हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: डिटेल क्लोथिंग लिमिटेड कंपनीची स्थापना 1992 साली झाली. कंपनीचे टॅक्सास ब्रॅंडचे विविध प्रकारच्या कपड्यांचे उत्पादन देशात 18 राज्यातील 800 दालनांमध्ये उपलब्ध आहे. केवळ अवघ्याच काळात कंपनीने देशात आपल्या उत्पादनाचा चांगल्या प्रकारे विस्तार केला आहे. टॅक्सास ब्रॅंडखाली कंपनीतर्फे सध्याच्या आधुनिक जीवनशैलीस पूरक असे जीन्स(डेनिम्स), ट्रावजर्स, शॉर्टस व कॅज्युअल शर्टसचे उत्पादन केले जाते.

गत चार दशकांपासून कापड उत्पादन उद्योगात कार्यरत असलेल्या कुटुंबातील एन तुलसीयान हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. 1980 पासून कपडे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना फॅब्रिकचा पुरवठा करण्याचा व नंतर उत्पादन करण्याचा त्यांच्यापाशी अनुभव आहे. मार्केटमध्ये नेमके कशाची व किती आवश्यकता आहे याचे उत्तम ज्ञान तुलसीयान यांना आहे. त्यांच्या या अनुभवाच्या जोरावर त्यांनी व कंपनीतील इतर सहकाऱ्यांनी व्यवसायाचा विस्तार केला. त्याच बरोबर उत्पादनाचा दर्जाही राखला.

कंपनीचे संबंधित विक्रेते व उत्पादकांना कपड्याच्या दर्जाचा पूर्ण विश्र्वास आहे व कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्याची त्यांची तयारी आहे. कंपनीच्या उत्पादनांची वेगवेगळ्या निकषांवरून चाचणी केली जाते. यात सातत्य, एकसारखेपणा, आयामी स्थिरता, रंग, आटण्यावर नियंत्रण वगैरेचा समावेश आहे. शिवाय गिऱ्हाइकांच्या पसंतीस उतरतील व त्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकेल असेच दर्जेदार कपड्यांचे उत्पादन कंपनीतर्फे केले जाते.

कंपनीचे समर्पित डिझाईनर्स, मार्केटींग व विक्री विभागातील कर्मचारी व गुणवत्ता नियंत्रक नवीनतम फॅब्रिक व शुद्धतेचे संशोधन करुन उत्पादित कपडे ग्राहकांसमोर आणले जातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आकाशात इंजिननं घेतला पेट अन् 272 प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग

हल्लेखोरांनी कार अडवली अन् 'शेलीं'ना ओढत नेलं, बगदादमध्ये भरदिवसा अमेरिकन महिला पत्रकाराचं अपहरण; सुरक्षा यंत्रणांकडून हाय अलर्ट

Ketu Nakshatra Parivartan: मघा नक्षत्रात केतुचं गोचर! 'या' 4 राशींसाठी 5 डिसेंबरपर्यंतचा काळ आव्हानात्मक; अचानक उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आर्थिक गणित कोलमडणार

VIDEO: "आम्ही तयार आहोत, हिम्मत असेल तर समोर या" इराणी लष्कराचा थरारक सराव अन् अमेरिकेला थेट धमकी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Goa Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य संशयितांना मोठा दिलासा! लुथरा बंधूंना म्हापसा सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT