Temperature to rise in Goa | Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: गोव्यात कमाल तापमानात घट; थंडीचा प्रभाव मंदावला! पुढील 48 तासांत कसे राहणार हवामान? वाचा

Goa Temperature: राज्यात कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांपर्यंत पोहोचला होता. आता त्यात घट होऊन कमाल तापमान ३३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa temperature update today

पणजी: राज्यात मागील आठवड्याभरापासून वाढलेल्या तापमानाच्या पाऱ्यात काही अंशी घट झाली आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांपर्यंत पोहोचला होता. आता त्यात घट होऊन कमाल तापमान ३३.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. मात्र, सामान्य तापमानाच्या तुलनेत काही अंश अधिक आहे.

त्यासोबतच किमान तापमानात मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. किमान तापमान २४ अंश सेल्सिअस पोहोचले असून सामान्य तापमानाच्या तुलनेत तब्बल ३.४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. मागील आठवड्यापासून काही अंशी थंडीचा प्रभाव दिवसेंदिवस ओसरत असून ऋतुबदलाचे संकेत दिसून येत आहेत.

सर्वसमान्यपणे फेब्रुवारी मध्यानंतर राज्यात थंडीचा प्रभाव कमी होत जातो व नंतर हळू-हळू उष्म्याच्या झळा वाढू लागतात. आता एकंदरीत उष्म्याचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून आलेअसून पुढील ४८ तासांत राज्यातील कमाल व किमान तापमान ३४ व २२ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT