Goa TeleManas Dainik Gomantak
गोवा

Goa TeleManas: मानसिक स्वास्थ्याबाबत समुपदेशनासाठी 'टेली मानस' हेल्पलाईनवर वर्षभरात 1000 कॉल

मोफत सेवा, संभाषण ठेवले जाते गोपनीय

Akshay Nirmale

TeleManas Goa: मानसिक अस्वास्थ्यातून अनेकजण नैराश्याकडे वळत असतात. त्यातून स्वतःचे जीवन संपविण्यापर्यंतही किंवा आत्महत्येचा प्रयत्न करण्यापर्यंतही अनेक जण येत असतात.

त्यासाठी केंद्र सरकारकडून मानसिक स्वास्थ्याबाबत फोनवरून मोफत माहिती, समुपदेशन, सल्ला, मार्गदर्शनाबाबतचा नॅशनल टेली मेंटल हेल्थ कार्यक्रम चालवला जातो.

या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणजे गोव्यातील टेलीमानस हा उपक्रम. या अंतर्गत राज्यात गेल्या वर्षभरात 1000 कॉल्स आले आहेत.

म्हणजेच राज्यातील सुमारे एक हजार जणांनी मानसिक स्वास्थ्याबाबत मार्गदर्शन, सल्ला, समुपदेशनाचा लाभ या फ्री हेल्पलाईनवरून घेतला आहे. ऑक्टोबर 2022 पासूनचा हा कालावधी आहे.

राज्यात टोल फ्री हेल्पलाइनची सुरवात केल्यापासूनची ही आकडेवारी आहे. मानसिक आरोग्यासाठी दर्जेदार समुपदेशन प्रदान करण्याचा उद्देश या उपक्रमाचा आहे.

आरोग्य मंत्री विश्वजीत राणे म्हणाले की, आम्ही एक नवीन मैलाचा दगड गाठला आहे. TeleManas Goa ला 1000 हून अधिक कॉल्स प्राप्त झाले आहेत. हे समाजातील प्रवेशयोग्य मानसिक आरोग्य समर्थनाचे महत्त्व दर्शवते. गोवा मॉडेलचा सकारात्मक परिणाम होत आहे, असेही राणे म्हणाले.

नॅशनल टेली मेंटल हेल्थ प्रोग्रामची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये करण्यात आली होती. हा उपक्रम NIMHANS च्या सहकार्याने आरोग्य सेवा संचालनालयाद्वारे चालवला जातो. गोव्यातील बांबोळी येथील मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्था (IPHB) ही संस्था या उपक्रमासाठी मार्गदर्शन करते.

टोल फ्री हेल्पलाइन नंबर 14416 किंवा 1800-891-4416 वर कॉल केल्यास संबंधिताला त्याच्या पसंतीची भाषा निवडू शकतात. ही सेवा मोफत असून यातील संभाषण गोपनीय ठेवले जाते.

समुपदेशनाव्यतिरिक्त, Telemanas कार्यक्रमाद्वारे मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी व्हिडिओद्वारे सल्लामसलत, ई-प्रिस्क्रिप्शन, फॉलो-अप सेवा आणि वैयक्तिक सेवाही दिली जाऊ शकते. यातून ग्रामीण भागातील ज्या रूग्णांना सल्ला आणि उपचारासाठी लांबचा प्रवास कराण्याची गरज भासत नाही. अशा रूग्णांचा वेळ आणि खर्च यामुळे वाचतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT