Goa-Mumbai Vande Bharat: इतर वंदे भारत गाड्यांच्या तुलनेत गोवा-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला कमी प्रतिसाद?

मध्ये रेल्वेची माहिती; बिलासपूर-नागपूर वंदे भारतला सर्वाधिक प्रतिसाद
Goa-Mumbai Vande Bharat
Goa-Mumbai Vande BharatDainik Gomantak
Published on
Updated on

Goa-Mumbai Vande Bharat Train: वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सध्या देशात एकूण 34 हायस्पीड वंदे भारत ट्रेन धावत आहेत. 2019 मध्ये पहिल्या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून ही गाडी प्रवाशांमध्ये लोकप्रिय होत आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेने सप्टेंबरसाठी यादी जाहीर केली आहे. कोणत्या मार्गावरील वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद आहे, तर कोणत्या मार्गावर कमी प्रतिसाद आहे, हे सांगितले जाते. त्यानुसार गोवा-मुंबई आणि शिर्डी मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मात्र कमी प्रतिसाद असल्याचे यातून समोर आले आहे.

वंदे भारत ट्रेनची संख्या सतत वाढत आहे. त्यात आता मध्य रेल्वेने कोणत्या मार्गावर कोणत्या ट्रेनला किती ऑक्युपन्सी मिळाली, हे सांगितले आहे.

Goa-Mumbai Vande Bharat
Vishwajit Rane: मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत! गोव्यातील जनतेची प्रगती व्हावी... मंत्री विश्वजीत राणे यांचे 'महाकाल'ला साकडे

सर्वाधिक प्रतिसाद असलेली वंदे भारत ट्रेन

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस (20825) मध्ये सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 122.71 टक्के ऑक्युपन्सी होती. तथापि, या परतीच्या नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस (20826) ट्रेनला 99.14 टक्के ऑक्युपन्सी होती.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर एक्स्प्रेस (22225) ची ऑक्युपन्सी होती 108.63 टक्के. तर उलट सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (22226) या ट्रेनची ऑक्युपन्सी होती 101.47 टक्के.

छत्रपती शिवाजी टर्मिनस-गोवा वंदेभारत एक्सप्रेसला कमी प्रतिसाद

छत्रपती शिवाजी टर्मिनस-गोवा एक्स्प्रेस आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस-शिर्डी एक्स्प्रेस या वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळाला आहे.

गोवा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (22230) या वंदे भारत ट्रेनला 90.02 टक्के ऑक्युपन्सी लाभली आहे तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा (22229) या वंदे भारत ट्रेनला सप्टेंबरमध्ये 98.46 टक्के ऑक्युपन्सी मिळाली आहे.

Goa-Mumbai Vande Bharat
Goa BITS Pilani: गोव्यातील विद्यार्थ्यांला वर्षाला 60 लाख रूपये पगार; आंतरराष्ट्रीय संस्थेने दिली ऑफर...

तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-शिर्डी एक्स्प्रेस (22223) ने 82.69 टक्के ऑक्युपन्सी मिळवली असून शिर्डी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस (22224) ची ऑक्युपन्सी 84.01 टक्के होती.

दरम्यान, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 9 नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, झारखंड आणि गुजरातच्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com