Vishwajit Rane: मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत! गोव्यातील जनतेची प्रगती व्हावी... मंत्री विश्वजीत राणे यांचे 'महाकाल'ला साकडे

उज्जैनमधील मंदिरात दिव्य भस्म आरतीला उपस्थिती
Vishwajit Rane At Ujjain
Vishwajit Rane At UjjainDainik Gomantak

Vishwajit Rane At Ujjain: गोव्याचे वन, आरोग्य, नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे आज, सोमवारी मध्यप्रदेशातील उज्जैनच्या बाबा महाकाल मंदिरात दशर्नासाठी आले. यावेळी त्यांनी येथील दिव्य भस्म आरतीला उपस्थिती लावली.

दरम्यान, बाबा महाकाल यांच्याकडे 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती, विश्वजीत राणे यांनी दिली.

Vishwajit Rane At Ujjain
Goa BITS Pilani: गोव्यातील विद्यार्थ्यांला वर्षाला 60 लाख रूपये पगार; आंतरराष्ट्रीय संस्थेने दिली ऑफर...

त्यांनी नंदी हॉलमधून बाबा महाकालची आरती पाहिली आणि त्यानंतर बाबा महाकालची पूजा केली. पंडित आकाश गुरू त्यांच्यासमवेत होते.

ते म्हणाले, मी बाबा महाकाल यांच्या दरबारात दिव्य दर्शनासाठी आलो होतो. महाकालची दिव्य भस्म आरती पाहण्यासाठी आलो. येथे मी बाबा महाकाल यांच्याकडे पुन्हा मोदींच पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली. देशाला त्याची गरज आहे.

बाबा महाकाल यांचा आशीर्वाद सदैव राहावा. देशाची प्रगती होवो आणि गोव्यातील जनताही पुढे जात राहो.

राणे म्हणाले, माझ्या भावना बाबा महाकाल यांच्याशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा भेटायला येतो. जेव्हा जेव्हा मला बाबा महाकालाचे दर्शन घेण्याचा संकेत मिळतो तेव्हा मी लगेच त्यांच्या दरबारात येतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com