Goa Teachter Agitation : शिक्षकांनी धुडकावले मुख्यमंत्र्यांचे आश्वासन Dainik Gomantak
गोवा

शिक्षकांनी धुडकावले मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुख्यमंत्र्यांनी केली पुन्हा जुन्याच आश्‍वासनांची उजळणी..

दैनिक गोमन्तक

पणजी: पगारातील वाढ, भत्ते आणि 12 महिन्याचा करारनामा हा मुख्यमंत्र्यांनी (CM Pramod Sawant) दिलेला प्रस्ताव धुडकावून लावत आज शनिवारी चौथ्या दिवशीही शिक्षकांनी आंदोलन (Goa Teachter Agitation) कायम ठेवले आहे. हे आंदोलन आहोरात्र सुरू असून गेल्या दोन दिवसांत दोन शिक्षकांची प्रकृती बिघडल्याची घटना घडली होती. त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

गेल्या चार दिवसांपासून राज्यातील 54 कंत्राटी शारीरिक शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन छेडले आहे. शिक्षकांना अनेक राजकीय पक्षांसह संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

आज गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी त्यांची भेट घेऊन कैफियत जाणून घेतली. यावेळी त्यांनी आंदोलनस्थळावरूनच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना फोन करून शिक्षकांची समस्या सोडविण्याची मागणी केली. त्याची दखल घेत मुख्‍यमंत्र्यांनी शिक्षकांना महालक्ष्मी शासकीय निवासस्थानी चर्चेसाठी पाचारण केले.

चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सहा महिन्यांपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांची उजळणी केली. वेतन 16 हजारांवरून 25 हजार करण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्याशिवाय भत्ते आणि 12 महिन्यांचा सेवा करार करण्याची तयारी दर्शविली. ती शिक्षकांनी धुडकावून लावली असून सेवेत कायम करून घेण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत.

मुख्यमंत्र्यांनी जुन्याच आश्‍वासनांची उजळणी केली आहे. आमची मागणी सेवेत कायम करा अशी आहे. पगार वाढीचे गाजर दाखवून आम्हाला झुलवत ठेवण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याने आंदोलनातून माघार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल.

- गंगाराम लांबोर, शिक्षक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

October Temperature: गोव्यात ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा विक्रम! पणजीत पारा 37.4 अंशांवर, म्हापशात 39.6 अंशांची नोंद

Horoscope: नवरात्रीचा पाचवा दिवस ठरणार भाग्याचा! 5 राशींचे नशीब चमकणार; प्रगतीचे संकेत, आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Tourist Death: कळंगुटमध्ये उघड्या लोखंडी सळ्यांनी घेतला पर्यटकाचा जीव; बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

New Medical College: गोव्यात नवे मेडिकल कॉलेज; 50 एमबीबीएस जागांना केंद्राची मंजुरी, निम्म्या जागा गोमंतकीयांसाठी

SCROLL FOR NEXT