Goa Teachers Agitation : आझाद मैदानावर शिक्षकांचे आंदोलन Dainik Gomantak
गोवा

पुन्हा एकदा आंदोलना दरम्यान दुसऱ्या गोवा शिक्षकाची प्रकृती गंभीर

सरकार कडून आंदोलकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत असून आंदोलक शिक्षकांचा संयम सुटत आहे..

दैनिक गोमन्तक

पणजी : Goa येथील आझाद मैदानावर शारिरीक शिक्षकांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन छेडले (Goa Teachers Agitation) आहे. दरम्यान, गुरुवारी दिनांक 28 समीर गावकर हे अत्‍याव्यस्थ झाले होते; काल पुन्हा एका शिक्षकांची प्रकृती बिघडली आहे. इतर पक्षनेते आंदोलकांची भेट घेत असताना सरकार मात्र आंदोलकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत असून आंदोलक शिक्षकांचा संयम सुटत आहे.

बुधवारपासून (ता. 27) आझाद मैदानावर नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी विविध शाळांत कार्यरत असलेल्या 54 शारिरीक शिक्षकांनी आहोरात्र आंदोलन छेडले आहे. दरम्यान, आंदोलकांची प्रकृती बिघडत असतांनाही सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे आंदोलक शिक्षक आक्रमक झाले असून सरकार दखल घेत नसेल, तर मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू, असा इशारा गंगाराम लांबोर यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिला. सध्या आंदोलनस्थळावर सरकारकडून रूग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्वच राजकीय पक्षांनी शिक्षकांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. काल शुक्रवारी मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी आंदोलक शिक्षकांची भेट घेतली. त्यांनी तुम्ही आमच्यासोबत रहा, आम्ही तुमचा प्रश्‍न निकाली काढू अशी ग्वाही दिली. आपच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला. विरोधक शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देत असतांना सरकार मात्र ढिम्म असल्याने संताप व्यक्त होत आहे.

सरकार जबाबदार

आंदोलनकर्त्या शिक्षकांची प्रकृती खालावत असून त्यांना काही झाल्यास सरकार जबाबदार असेल. शिक्षकांचे आंदोलन आझाद मैदानावर सुरू असूनही मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे शिक्षण खाते असूनही त्यांना या शिक्षकांचे काहीच पडलेले नाही, असा आरोप गोवा फॉरवर्डच्या नेत्यांनी केला.

शिक्षकांच्या आंदोलनाने आम्हीही व्यथीत झालो आहोत. मुख्यमंत्री लागलीच योग्य तो निर्णय घेतील. कंत्राटी शिक्षकांना नोकरीत कायम करण्याची सोय आहे. त्याआधारे प्रक्रिया सुरू करता येईल. सरकारकडे अजून 60 दिवस आहेत, याकाळात निर्णय घेतला जाईल. मी मंत्री नसल्यामुळे जबाबदारीने बोलू शकत नाही.

भाजप आमदार - सुभाष शिरोडकर,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT