पणजी : Goa राज्यात गेली अनेक वर्षे नोकरभरती झाली नाही, तसेच कोविड काळात (Covid Pandamic) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या याचा परिणाम राज्यतील आत्महत्येच्या (Suicide Case in Goa) प्रमाणावर झाला आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये गोव्यात आत्महत्येचे प्रमाण हे 19 टक्क्यांनी वाढले आहे. 308 जणांनी आत्महत्या केली त्यामधील बेरोजगारीच्या नैराश्यतेतून आत्महत्या केलेल्यांची संख्या ही 43 एवढी आहे. देशात आत्महत्येच्या प्रमाणात 10 टक्के वाढ झाली असताना गोव्यात 19 टक्के आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
‘एनसीआरबी’ च्या माहितीनुसार, कोविड काळात गोव्यात बेरोजगारीमुळे आत्महत्या केलेल्यांचे प्रमाण वाढले. कोविड व टाळेबंदीमुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. 2019 मध्ये आत्महत्या केलेल्यांची संख्या 259 होती मात्र 2020 मध्ये ही संख्या 308 वर गेली. यातील एक तृतियांश जणांनी दीर्घकाळ आजार व मानसिक तसेच शारीरिक मनोबल खचल्याने आत्महत्या केली. ऑक्टोबर 2021 पर्यंत कोरोना महामारीचा फटका जबर बसल्याने अनेक जणांना नैराश्य आले. बहुतांश कारणे बेरोजगार, थकित कर्ज, अार्थिक परिस्थिती खालावली आहे.
53 जणांची कौटुंबिक वादातून आत्महत्या
2020 मध्ये नोंद झालेल्या आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये 53 जणांनी कौटुंबिक वादातून तर 27 जणांनी अमलीपदार्थाच्या सेवनातून व मद्यप्राशनच्या व्यसनातून आत्महत्या केल्या. 19 जणांनी प्रेमप्रकरणातून तर 11 जणांनी मालमत्तेच्या वादावरून आत्महत्या केल्या आहेत. 308 आत्महत्येच्या प्रकरणांपैकी 241 जणानी गळफास लावून तर ३६ जणांनी पाण्यात उडी घेऊन, 25 जणांनी विष घेऊन तर 4 जणांनी आत्मदहन करून आत्महत्या केली. बेरोजगारीमुळे 43 जणांनी आत्महत्या केली त्यामध्ये 41 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे. 2019 साली बेरोजगारीमुळे 19 जणांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे कोविड काळात दुपटीने वाढ झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.