Student assault case  Dainik Gomantak
गोवा

Student Assault Case: 16 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरोधात पोलिस कारवाई; चौकशीसाठी हजर राहण्याची तंबी

Legal Action Against Teacher: एका १६ वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी शिक्षिकेविरोधात गोवा बालकायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: एका १६ वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी शिक्षिकेविरोधात गोवा बालकायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पीडित मुलगा इयत्ता दहावीत शिकतो. याप्रकरणी पोलिसांनी संशयित शिक्षिकेला बीएनएस ३५(३) कलमाअंतर्गत चौकशीसाठी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी नोटीस जारी केली आहे.

दरम्यान, शालेय व्यवस्थापनानेही या शिक्षिकेवर (Teacher) आवश्यक कारवाई करण्यासंदर्भातील पत्र शिक्षण संचालनालयाला पाठविल्‍याचे सूत्रांनी सांगितले. ही घटना २४ जानेवारी रोजी दुपारी घडली होती.

संशयित शिक्षिकेने रागाच्या भरात विद्यार्थ्याला (Student) स्टीलच्या पट्टीने मारहाण केली तसेच कानशिलातही लगावली. मुलाने पिण्याच्या पाण्यासाठी वारंवार आग्रह धरल्याने शिक्षिकेला राग अनावर झाला. त्यातूनच हे कृत्‍य घडले. ही घटना त्‍या मुलाने आपल्या घरी कथन केली. त्यानंतर पीडितेच्या आईने मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT