Goa School 
गोवा

रिलेशनशीप, मोबाईलवरुन वर्गात अपमान केला, मानसिक धक्का बसलेल्या 17 वर्षीय मुलीने शाळाच सोडली; गोव्यात शिक्षकाविरोधात गुन्हा

Goa teacher booked: शिक्षकाने 17 वर्षीय विद्यार्थीनीला सर्व वर्गासमोर अपनास्पद वागणूक दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

Pramod Yadav

कळंगुट: विद्यार्थीनिला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी बार्देशमधील उच्च माध्यमिक शाळेच्या शिक्षकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वर्गातच खोटे आरोप करुन अपमान केल्यानंतर १७ वर्षीय विद्यार्थीनीला जबर मानसिक धक्का बसला आणि तिने शाळेत जायचं बंद केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. साळगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय पीडित विद्यार्थीनीच्या पालकांनी याप्रकरणी साळगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिक्षकाने विद्यार्थीनीला सर्व वर्गासमोर अपनास्पद वागणूक दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे. २६ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता ही घटना घडली.

शिक्षकाने विद्यार्थीनीवर खोटे आरोप केले. यात तिच्या वैयक्तिक रिलेशनशीप आणि कॅम्पसमध्ये मोबाईल वापरण्यावरून अपमान केला.

यामुळे विद्यार्थीनीला जोरदार मानसिक धक्का बसला असून, भावनिक त्रास झाला. मानसिक धक्क्यामुळे विद्यार्थीनी सध्या मानसोपचार घेत असून, शिक्षण सोडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर साळगाव पोलिसांनी याप्रकरणी गोवा बाल कायदा कलम ७ आणि बालन्याय (बाल सुरक्षा) कायदा कलम ७५ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सर्वेश भंडारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana Record: विराट-रोहितला जमलं नाही ते स्मृती मानधना करणार! टी-20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचण्याची संधी, फक्त इतक्या धावांची गरज

Gram Panchayat CCTV Plan: गोव्यातील प्रत्येक पंचायतीवर सीसीटीव्हीची नजर! तीन आठवड्यांत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

Karnataka Accident: कर्नाटकात प्रवाशांवर काळाचा घाला! बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक; 4 ठार, 14 जखमी

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

SCROLL FOR NEXT