Viral Video: हातात बेड्या, शेजारी पोलिस तरीही बेभान होऊन नाचला; मित्राच्या लग्नासाठी जेलमधून आला सरदार भावड्या

Punjabi man viral video: सरदार अगदी बेभान होऊन संगीताच्या तालावर नाचत आहे. यावेळी शेजारी असणारे दोन पोलिस कर्मचारी त्याच्याकडे पाहत आहेत.
Viral video police escort dance | Jail inmate wedding leave video
Punjabi man dancing handcuffed VideoDainik Gomantak
Published on
Updated on

मित्राच्या लग्नासाठी जेलमध्ये असलेल्या सरदार मित्राने हजेरी लावली, एवढेच नव्हे तर हातात बेड्या असताना देखील सरदार संगीताच्या तालावर लग्नाच्या वरातीत थिरकला. यावेळी शेजारीच पोलिस उभं असल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचा धुमाकूळ घालत असून, मीम्सला उधाण आले आहे.

एक व्यक्ती निळ्या रंगाची जीन्स, पायात बूट घालून पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याच्या एका हातात बेड्या ठोकलेल्या असून, त्याचा साखळदंड पोलिसांच्या हातात. सरदार अगदी बेभान होऊन संगीताच्या तालावर नाचत आहे. यावेळी शेजारी असणारे दोन पोलिस कर्मचारी त्याच्याकडे पाहत आहेत.

Viral video police escort dance | Jail inmate wedding leave video
अग्रलेख: ‘कॅश फॉर जॉब’मध्ये 'पूजा' कलंकित ठरली, परंतु तिचा ‘गॉडफादर’ कोण हे कळायलाच हवे..

या व्यक्तीने लग्नाच्या समारंभात आलेल्या सर्वांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेतले आहे. त्याच्यासोबत त्याचे इतर मित्र देखील नाचताना दिसत आहेत. यावेळी याठिकाणी आणखी एक वरिष्ठ पोलिस कर्मचारी उभे असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरला असून, मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

Viral video police escort dance | Jail inmate wedding leave video
Konkani Drama Competition 2025: कोकणी नाट्यस्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ‘भोगपर्व’ प्रथम, जाणून घ्या संपूर्ण निकाल..

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी सम्रिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. बॉईज् विल बी बॉईज, मुलं मित्राच्या लग्नासाठी जेलमधून देखील उपस्थित राहू शकतात, अशा प्रकारच्या कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

हा व्हिडिओ पंजाब अथवा हरियाणा येथील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय बेड्या घातलेला व्यक्ती कोण आहे, याची देखील ओळख पटलेली नाही. दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com