Taxis in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi : गोव्यातील टॅक्‍सीव्यावसायिकांचे अस्तित्वच धोक्यात? ताम्हणकरांचा नेमका आरोप काय?

बॅच रद्द करण्‍याचा निर्णय धक्कादायक; एकजुटीचं सुदीप ताम्हणकराचं आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

मोपा येथील मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळवरील टॅक्सीचालकांसाठी टॅक्सी बॅच रद्द करण्याचा निर्णय पर्यटन व वाहतूक खात्याच्या झालेल्या बैठकीत हल्लीच घेण्यात आला. हा निर्णय गोमंतकीय टॅक्सींचे अस्तित्वच धोक्यात आणणारा आहे. पुढील वर्षापर्यंत गोव्यातील पारंपरिक बसेस व टॅक्सी व्यवसाय बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे टॅक्सीचालक संघटनांनी एकत्र येऊन त्‍यास विरोध करावा, असे आवाहन आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी केले.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ताम्हणकर म्हणाले की, बॅच असलेल्यांनाच टॅक्सीव्यवसाय करता येत होता. हल्लीच पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत वाहतूक संचालक राजन सातार्डेकर व पर्यटन संचालक निखिल देसाई उपस्थित होते. यावेळी संचालक देसाई यांनी सध्या टॅक्सीचालकांना सक्तीचा असलेला बॅच रद्द करण्याचा विषय मांडला व त्याला संमती देण्यात आली. यापूर्वी त्यांनीच गोव्यात गोवा माईल्स आणले होते व आता हा बॅच रद्द करण्याचा निर्णय घेऊन टॅक्सीचालकांचे अस्तित्व नष्ट करण्याचा डाव आखला आहे. पुढील वर्षापर्यंत गोमंतकीयांचा बस व टॅक्सी व्यवसाय इतिहासजमा होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

राज्यात सध्या धावणाऱ्या कदंबच्या इलेक्ट्रिक बसेस या मोपा विमानतळाकडे वळविण्यात आल्या. दुसरीकडे वाहतूक व पर्यटनमंत्र्यांकडून पेडणे भागातील लोकांना टॅक्सी व्यवसायास प्राधान्य दिले जाईल अशी आश्‍वासने दिली जात आहेत. मोपा भागातील काही युवक व ज्यांच्या जमिनी या विमानतळासाठी गेल्या आहेत त्यांना या मंत्र्यांकडून स्वप्ने दाखविली जात आहेत. आधी त्यांना या टॅक्सी खरेदीसाठी सरकारने मदत करण्याची गरज आहे, असे ताम्‍हणकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Match Fixing: क्रिकेट विश्वात मोठा भूकंप! टी-20 वर्ल्ड कपमध्ये फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटकडून चौकशी सुरु

Horoscope April 2026: 30 एप्रिलपर्यंत 'नो रिस्क'! ग्रहांची बदलली चाल, मेष राशीचं वाढलं टेन्शन; चुकीच्या निर्णयामुळे अडकू शकता संकटाच्या चक्रव्यूहात

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

SCROLL FOR NEXT