Primary Health Centre Goa: डिचोलीत आरोग्य केंद्रासमोरच बेशिस्त वाहन पार्किंगचे प्रकार वाढले

Primary Health Centre Goa: आरोग्य केंद्रासमोर बेशिस्त पार्किंगमुळे अपघाताचीही शक्यता असून या प्रकाराकडे कोणाचेच लक्ष जात नाही.
Bicholim Primary Health Centre, Goa
Bicholim Primary Health Centre, GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim: डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राजवळ बेशिस्तपणे वाहने पार्क करून ठेवण्याचे प्रकार वाढल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. आरोग्य केंद्र इमारतीच्या मुख्य फाटकासमोर मुख्य रस्त्याला टेकूनच बऱ्याचदा बेशिस्तपणे मोटारगाड्या आदी वाहने उभी करून ठेवली जातात. त्यामुळे मुख्य फाटकाजवळ अडथळा निर्माण होतो.

अशाप्रकारच्या बेशिस्त पार्किंगमुळे येथे अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. ही वाहने केवळ आरोग्य केंद्रात तपासणी आदी कामांसाठी येणाऱ्यांचीच नसतात. तर काहीजण त्या ठिकाणी वाहने पार्क करून आपापल्या कामांसाठी निघून जातात.

रुग्णवाहिकेला अडथळा आरोग्य केंद्राच्या मुख्य फाटकाबाहेर मिळेल तिकडे आडवी-तिडवी वाहने पार्क करून ठेवली जातात. यामुळे रुग्णवाहिका आदी वाहने मुख्य रस्त्यावरून आत आणि बाहेर घेताना अक्षरशः कसरत करावी लागते. एखाद्या आपत्कालीन प्रसंगावेळी रुग्णाला उपचारार्थ न्यायचे झाल्यास अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Bicholim Primary Health Centre, Goa
Goa Court: खुनाचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक का केली नाही? गोवा खंडपीठानं सरकारला विचारला जाब

देविदास राऊळ, नागरिक-

आरोग्य केंद्रासमोर बेशिस्तपणे वाहने उभी करून ठेवण्याचे प्रकार नित्याचेच बनले आहेत. त्यामुळे समस्या निर्माण होत असते. या प्रकाराकडे कोणाचेच लक्ष जात नाही. या बेशिस्तपणामुळे एखादेवेळी मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com