Goa tourism news Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: "पुन्हा दिसलात तर गाडी पंक्चर करेन" पर्यटकांना 'वेठीस' धरत टॅक्सी चालकांमध्ये वाद

Goa Taxi Controversy: या व्हिडीओमध्ये टॅक्सी चालकांचा एकमेकांमध्ये वाद सुरु असलेला पाहायला मिळतोय

Akshata Chhatre

पणजी: गोव्यात अनेक दिवसांपासून स्थानिक टॅक्सी ऑपरेटर आणि अ‍ॅप-आधारित टॅक्सी ऑपरेटर यांच्यामध्ये वाद सुरु आहेत, मात्र या वादाचा फटका पर्यटकांना बसतोय. काही वेळापूर्वी गोव्यातील पर्रा येथू असाच व्हिडीओ समोर आला, या व्हिडीओमध्ये टॅक्सी चालकांचा एकमेकांमध्ये वाद सुरु असलेला पाहायला मिळतोय. काहीवेळा तर दोघे एकमेकांना शिवीगाळ देखील करतायत पण यामुळे पर्यटक पूर्णपणे घाबरलेल्या आणि चित्तांतातूर अवस्थेत पाहायला मिळतायत.

आम्ही पर्यटक, आमची काय चूक?

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोघा टॅक्सी चालकांचा वाद झालेला पाहायला मिळतोय. या प्रकरणावर पर्यटकांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीये. हॉटेलमधून निघताना आम्ही टॅक्सी बुक केली होती मात्र निघताच स्थानिक टॅक्सी चालकांनी आम्हाला घेरलं. आम्ही पर्यटक आहोत यात आमची काय चूक? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

लहान मुलगी, पत्नी यांच्यासह गोव्यात आलेल्या एका पर्यटकाने माध्यमांना ही माहिती दिली. "गोव्यात स्थानिक टॅक्सी चालक गाडी पुढे जाऊ देत नाहीत, मग आम्ही करावं तरी काय?" असं पर्यटक म्हणालाय. स्थानिक टॅक्सी चालकांनी त्यांचे सामान उचलून नेले, टॅक्सीने सोडा म्हटलं तरीही याला नकार दिला मग टॅक्सी बुक करण्याशिवाय आमच्या समोर काही पर्याय उपलब्ध राहील अशी हताश प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केली.

व्हिडिओमध्ये स्थानिक टॅक्सी चालक अ‍ॅप-आधारित टॅक्सी चालकाला धमकावतोय, टॅक्सीचे बुकिंग घेऊन तुम्ही आमचं भाडं कसं-काय चोरताय असा आरोप करताना दिसतोय. मात्र यावर अ‍ॅप-आधारित टॅक्सी चालक त्याला समजावत वाट सोडण्याची विनंती करतोय. एवढंच नाही तर स्थानिक टॅक्सी चालक गाडी पंक्चर करण्याची धमकी देत, पुन्हा इथे गाडी सोबत दिसायचं नाही असं म्हणत दमदाटी करताना दिसतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT