Goa Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: 'मोपा'वरील 'ब्लू कॅब' टॅक्सी व्यवसाय संकटात, कोपऱ्यातील कक्ष मिळाल्याने दिवसाला 4 फेऱ्या मिळणेही कठीण

Mopa Airport: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांचा व्यवसाय (ब्लू कॅब) संकटात सापडला आहे.

Sameer Amunekar

पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांचा व्यवसाय (ब्लू कॅब) संकटात सापडला आहे. विमानतळावर त्यांना व्यवसायासाठी अगदी कोपऱ्यातील कक्ष उपलब्ध केल्याने दिवसाला चार फेऱ्याही मिळणे कठीण झाले आहे.

यामुळे ब्लू कॅब प्रीपेड टॅक्सी असोसिएशनने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आपल्या टॅक्सी संघटनेला पहिला काउंटर कायमस्वरूपी देण्याची मागणी केली आहे. संघटनेने वार्षिक नूतनीकरणाची अट रद्द करून ‘जीएमआर’मार्फत न करता थेट सरकारमार्फत काउंटर देण्यात यावा, अशी विनंती केली आहे.

संघटनेने सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सध्या त्यांच्या टॅक्सी काउंटरची जागा मोपा विमानतळावर शेवटच्या टोकावर असून त्यामुळे त्यांना पुरेशा प्रमाणात ग्राहक मिळत नाहीत. त्यामुळे १७० सदस्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. याबाबत जुलै महिन्यातील दररोजच्या टॅक्सी सेवा व्यवहाराचा चार्टही त्यांनी सादर केला आहे.

याशिवाय, पिलर क्रमांक ए १४ पासून सुरू होणारा पहिला पिकअप पॉईंट व पार्किंग बे देखील ब्लू कॅब प्रीपेड टॅक्सी असोसिएशनसाठी राखीव ठेवावा, अशीही संघटनेची मागणी आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले होते लक्ष देण्याचे आश्वासन

संघटनेचे अध्यक्ष संजय कांबळी आणि रामचंद्र गावडे यांनी सह्या केलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की, जून व जुलै महिन्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागणीकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, तसेच वाहतूक खात्याचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी अशाप्रकारचा बदल केल्यास टॅक्सी व्यवसायास चालना मिळेल, असेही अधोरेखित करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT