Goa taxi app Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi App: 95% गोमंतकियांचे टॅक्सी ॲप धोरणाला समर्थन, टीटीएजीतर्फे गुप्त सर्वेक्षण, धोरण दूरदृष्टीचे असल्याचा दावा

Goa Taxi App Policy: सुखिजा म्हणाले की, जेव्हा आम्ही सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते गुप्ततेत पार पडले. कुठेही मोठा प्रचार केला नाही.

Sameer Panditrao

पणजी: गोवा सरकारने राबवलेल्या टॅक्सी ॲप धोरणाला व्यापक जनसमर्थन मिळत असून, त्याबाबत टीटीएजीने (ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा) केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ९५ टक्के लोकांनी या धोरणास पाठिंबा दर्शवला आहे. टीटीएजी अध्यक्ष जॅक सुखिजा यांनी ही माहिती देताना या धोरणाचे भविष्यकालीन फायदे अधोरेखित केले.

सुखिजा म्हणाले की, जेव्हा आम्ही सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते गुप्ततेत पार पडले. कुठेही मोठा प्रचार केला नाही. पण अवघ्या दोन दिवसांत ४००० हून अधिक लोकांनी सरकारच्या टॅक्सी ॲप धोरणास समर्थन दिले. यावरूनच हे धोरण लोकांच्या मनात किती स्वीकारले गेले आहे, हे स्पष्ट होते.

टॅक्सी ॲप धोरण केवळ तांत्रिक नव्हे तर दूरदृष्टीचे असल्याचेही टीटीएजीने नमूद केले आहे. हे धोरण पर्यटक, स्थानिक नागरिक, टॅक्सी चालक सर्व घटकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. पर्यटन क्षेत्रातील प्रमुख भागधारक संघटना म्हणून आम्ही या उपक्रमाला आमचा पूर्ण पाठिंबा देतो, असे सुखिजा यांनी स्पष्ट केले.

सरकारच्या टॅक्सी ॲप्समुळे टॅक्सी चालकांना भाड्याचे दर पारदर्शकपणे मिळतील, असेही टीटीएजीने सांगितले.

जे चांगले आहे, ते स्वीकारणे आवश्यक

जॅक सुखिजा यांनी सांगितले की, जे धोरण पर्यटकांसाठी योग्य आहे आणि पर्यटन व्यवसायाला चालना देणारे आहे, ते स्वीकारणे हीच वेळेची गरज आहे. आपल्याला यशस्वी पर्यटन उद्योग हवा असेल, तर अशी धोरणे मार्गी लावणे आवश्यक आहे.

सकारात्मक पाऊल

‘गोवा टॅक्सी ॲप’ आणि ‘गोवा माईल्स’मुळे टॅक्सी सेवा अधिक नियोजित, पारदर्शक आणि पर्यटक-मित्र बनवण्याचा उद्देश सरकारने ठेवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT