Medical help for 17-year-old Fatorda Dainik Gomantak
गोवा

माझ्या मुलाला वाचवा! दुर्धर आजारामुळे मातेचा कळवळा, श्रमाच्या कामामुळे हृदय पडते बंद

Suzanne Fernandes Appeal For Donations: माडेल-फातोर्डा येथील रहिवासी सुझान व शेनन या मायलेकाची ही गोष्‍ट आहे. सुझान हिचे पती रवी फर्नांडिस हे खलाशी असून सहा ते आठ महिने ते घरापासून दूर राहतात.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: एका दुर्धर आजाराने त्रस्‍त असलेल्‍या आपल्‍या १७ वर्षीय मुलावर उपचार करण्‍यासाठी लाखों रुपयांचा खर्च येणार असल्‍याने वैद्यकीय उपचारासाठी समाजातील दात्‍यांनी आपल्‍याला मदत करावी, अशी हाक फातोर्डा येथील सुझान फर्नांडिस यांनी मारली आहे.

माडेल-फातोर्डा येथील रहिवासी सुझान व शेनन या मायलेकाची ही गोष्‍ट आहे. सुझान हिचे पती रवी फर्नांडिस हे खलाशी असून सहा ते आठ महिने ते घरापासून दूर राहतात. सुझान यांना शॉन व शेन अशी दोन मुले असून शेनन हा त्‍यांचा तिसरा मुलगा. शेनन याच्‍या जन्‍माच्‍या आधी सुझान यांच्‍या गर्भारपणाच्‍या काळात वैद्यकीय तपासणीवेळी काही तरी अडचणी दाखवण्‍यात आल्‍या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलाच्‍या हृदयाचे ठोके जाणवत नसल्‍याचे सांगितले. पण सुझान यांच्‍यातील आई ते मानण्‍यास तयार नव्‍हती. त्‍यानंतर दोन दिवस वाट पाहून शस्‍त्रक्रिया (Surgery) करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला.

शस्‍त्रक्रियेनंतर आपल्‍या मुलाला शेवटचे आपल्‍या हातात द्या अशी आईची विनवणी ऐकून डॉक्‍टरांनी मुलाला आई सुझानच्‍या हातात दिले. आईच्‍या हातात येताच मुलाने आईच्‍या हाताचे बोट पकडले. यानंतर शेनन मोठा होत गेला, तरीही त्‍याला नक्‍की कोणता आजार हे अनेक डॉक्‍टरांना समजले नव्‍हते.

सुझान हिने दिलेल्‍या माहितीप्रमाणे, शेननने श्रमाचे काम केल्‍यास तत्‍काळ त्‍याचे हृदय बंद पडते. यामुळे त्‍याच्‍या मेंदूला पोहोचणाऱ्या संवेदनांवरही परिणाम होत असतो. गोव्‍यासह (Goa) बंगळुरु व परदेशातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्‍या सहकार्याने शेननचे उपचार सध्‍या सुरु आहेत. त्‍याला मल्‍टीडिसऑर्डर असून त्‍याच्‍या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्चही फर्नांडिस कुटुंबीयांनी केलेला आहे.

सुझान यांनी सांगितले की, शेनन याला असलेल्‍या आजाराच्‍या जगात पाच व्‍यक्‍ती असू्न देशात तीन व गोव्‍यात शेनन हा एकटाच आहे. त्‍यामुळे त्‍याला लागणारी औषधे विविध ठिकाणाहून शोधून आणावी लागतात. सहा महिन्‍यांच्‍या औषधांची तरतूद आधीच करून ठेवावी लागते. शेनन याने दहावीच्‍या परीक्षेत विशेष श्रेणीत गुणही मिळविलेले आहेत व त्‍याला स्केटिंग व इतर खेळांची आवड आहे. शेननची आई सुझानने सांगितले की, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केलेल्‍या शेननला आतापर्यंत विविध आजारांतून, शस्‍त्रक्रियेतून काळजी घेत मोठे केलेले आहे.

शेननच्‍या जीवनावर तियात्र, पुस्‍तक

शेनन याच्‍या जीवनावर आधारित तियात्रही आलेले आहे, तसेच ‘द सायलेंट इको’ नावाचे पुस्‍तकही लिहिण्‍यात आलेले असून जगभरात ते पाठवण्‍यात आलेले आहे. आता त्‍याची ही कहाणी गोमंतकीयांना कळण्‍यासाठी रवींद्र भवन मडगाव येथे १९ रोजी सायंकाळी ७.३० वा. तियात्र सादर होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT