Mobile Theft  Dainik Gomantak
गोवा

Goa Sunburn: 'सनबर्न'च्या झळा! संगीत महोत्सवात चोरांची 'पार्टी', तब्बल १११ मोबाईल गहाळ

Mobile Theft at Sunburn Goa: तीन दिवस चालेल्या कार्यक्रमातून १११ जणांचे मोबाईल फोन हरविले किंवा चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आल्या

Akshata Chhatre

पेडणे: डिसेंबर महिन्यात गोव्यात सनबर्नचा भलामोठा संगीत महोत्सव पार पडला. स्थानिकांच्या विरोधानंतर तीन दिवस धारगळीत हा भव्य कार्यक्रम झाला. पण सनबर्ननंतर आता मात्र अनेक विचित्र घटना समोर येत आहेत. पोलिसांकडून केलेल्या कारवाईत ड्रग सेवनाचे अनेक प्रकार उघडकीस आले आणि त्यांनतर या तीन दिवस चालेल्या कार्यक्रमातून मोबाईल फोन चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.

धारगळ-पेडणे येथे सलग तीन दिवस चाललेल्या सनबर्न महोत्सवात १११ जणांचे मोबाईल फोन गहाळ झाले. यानंतर संबंधितांनी मोबाईल फोन चोरीला गेल्याच्या तक्रारी पेडणे पोलिस ठाण्यात नोंदवल्या आहेत. पेडणे पोलिसांनी यासंबंधी काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. विशेष म्हणजे, सनबर्न महोत्सवात सापडलेले मोबाईल फोन काहीजणांनी संबंधितांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती देखील उघड झाली आहे.

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी दलाकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अमलीपदार्थांच्या विरोधात कठोर कारवाई सुरु असून पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार सनबर्न संगीत महोत्सवातून एकूण पाच जणांनी अमलीपदार्थाचे सेवन केल्याची माहिती उघड झाली.

अमलीपदार्थ विरोधी दलाकडून केलेल्या चाचणीतून या पाचही जणांनी अमलीपदार्थांचे सेवन केल्याची पुष्टी झाली, पैकी चार जणांची चाचणी गांजासाठी पॉझिटिव्ह आली, तर एकाची चाचणी कोकेनसाठी पॉझिटिव्ह आली आहे.

पोलिसांनी सध्या या पाचही जणांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती अमलीपदार्थ विरोधी दलाचे पोलीस अधीक्षक तिकम सिंग वर्मा यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT