Goa Sunburn Dainik Gomantak
गोवा

Goa Sunburn: न्यायालयाची अट धुडकारली? पहिल्याच दिवशी सनबर्नचं म्युझिक लाऊड

Goa Sunburn Controversy: आवाजाची तीव्रता उपलब्ध होईल, अशा प्रकारे ध्वनी मापन यंत्रे बसविल्याचा ग्रामस्थांचा दावा

Akshata Chhatre

पेडणे: सनबर्न फेस्टिव्हलमध्ये न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे आयोजकांनी काटेकोरपणे पालन न करता आपल्या सोयीनुसार आवाजाची तीव्रता उपलब्ध होईल, अशा प्रकारे ध्वनी मापन यंत्रे बसविल्याचा दावा ग्रामस्थांनी धारगळ येथे सुरू झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी केला.

शनिवार (दि. २८ डिसेंबर) पासून धारगळ येथे हजारो संगीतप्रेमींच्या उपस्थितीत सनबर्न महोत्सवाला शनिवारी प्रारंभ झाला. महोत्सवासाच्या ठिकाणी न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे काटेकोरपणे पालन करण्यात येते की नाही, याचे निरीक्षण करण्यासाठी सनबर्न विरोधकांनी ध्वनी प्रदूषण मंडळाने बसविलेल्या ध्वनी मोजणी यंत्रणांची पाहणी केल्यानंतर हा दावा करण्यात आला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून गोव्यात सनबर्न संगीत महोत्सव व्हावा की नाही अशा चर्चा सुरु होत्या. पेडणे तालुक्यातील धारगळ येथे सुरु असलेल्या या संगीत महोत्सवाला स्थानिकांकडून विरोध दर्शविण्यात आला होता, त्यांचा मते अशा संगीत महोत्सवांमुळे प्रदूषण होतं आणि स्थानिकांना त्रास होतो मात्र त्यांनतर न्यायालयाने काही नियम आणि अटी घालून देत सनबर्न या संगीत महोत्सवाला परवानगी देऊ केली होती.

न्यायालयाकडून सनबर्न संगीत महोत्सवाच्या आयोजकांना अमुक एका पातळीच्या वर आवाज जाऊ नये असा आदेश दिला होता मात्र स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार याचे पालन झालेले नाही. सनबर्न संगीत महोत्सवाबद्दल पुढील सुनावणी ७ जानेवारी रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT