Sunburn Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Goa 2023: सनबर्न नंतर आता शापोरा महोत्सवात वाद; 'या' कारणास्तव हिंदुत्ववादी संघटनांसोबत काँग्रेसही आक्रमक

Sunburn Goa 2023: म्हापसा उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन दळवी यांची भेट घेऊन संबंधित आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी संघटनांनी केलीय.

Ganeshprasad Gogate

Sunburn Goa 2023: सनबर्न EDM कार्यक्रमादरम्यान भगवान शिवाच्या चित्रावरून वादंग निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचा आरोप सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता. यातच आता आणखी एका घटनेने भर पडली आहे.

12 व 13 जानेवारी 2024 रोजी होणार्‍या शापोरा महोत्सवाबद्दलही आता वाद सुरु झाला असून या कार्यक्रमाविषयी प्रसारित होणार्‍या सोशल मीडिया पोस्ट्समध्ये भगवान शिवांचा प्रचारात्मक हेतूंसाठी वापर केला जात असल्याचे हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे.

या कार्यक्रमाच्या तिकिटांवर भगवान महादेवाचे चित्र असल्याने व्यावसायिक हेतूंसाठी धार्मिक प्रतीकांचा वापर हा एक संवेदनशील मुद्दा असल्याने सर्व हिंदूत्ववादी संघटना आक्रमक बनल्या आहेत.

शनिवारी सकाळी हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, शिवराज्य प्रतिष्ठान, गोमंतक मंदिर महासंघ, स्वराज्य संघटना अशा सर्व हिन्दुत्ववादी संघटनांनी एकत्र येत म्हापसा उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन दळवी यांची भेट घेऊन संबंधित आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी केलीय.

आध्यात्मिक कार्यक्रम वगळता अन्य अशा कुठल्याही कार्यक्रमामध्ये ज्यामध्ये हिंदू देवीदेवतांचा अपमान होईल अशा कार्यक्रमस्थळी फोटो वापण्यास मज्जाव करण्यात यावा अशी मागणी या सर्व संघटनांनी केलीय.

तसेच सनबर्न फेस्टिव्हलमध्ये जाणीवपूर्वक धार्मिक अपमान केल्याचा आरोप करत उत्तर गोवा काँग्रेस कमिटी सदस्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. तसेच भगवान शिवाचे चित्र पारंपारिक पद्धतींच्या विरोधात असून याविरोधात तातडीने चौकशी करावी, असे आवाहन त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केले आहे.

गोव्यात सुरु असलेल्या सनबर्न EDM कार्यक्रमादरम्यान वादांची मालिका दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

सनबर्न कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीच दोन मुलींची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी असाच एक प्रकार घडला असून एक तरुणाची तब्येत बिघडल्याची बातमी समोर आली.

हे कमी कि काय म्हणून शापोरा महोत्सवाबद्दलही आता वाद सुरु झाल्याने आता महोत्सव आणि धार्मिक वाद असे समीकरण तयार होत असल्याचे बोलले जातेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT