Goa sugarcane farmers decline Dainik Gomantak
गोवा

Sugarcane Farming: गोव्यात ऊस उत्पादकांची संख्या घटली! लागवड क्षेत्र 46 टक्‍क्‍यांनी कमी; नारळ, सुपारीकडे वळले शेतकरी

Goa sugarcane farmers decline: मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी सादर केलेल्‍या आकडेवारीनुसार, २०२०–२१ मध्‍ये राज्‍यातील ६७६ शेतकरी ५४६ हेक्‍टर क्षेत्रात ऊसाची लागवड करीत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्‍यातील एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखाना बंद झाल्‍यापासून गेल्‍या पाच वर्षांत ऊस उत्‍पादकांमध्‍ये ४४ टक्‍क्‍यांनी, तर ऊस लागवड क्षेत्रात ४६ टक्‍क्‍यांनी घट झालेली आहे. आमदार व्‍हेंझी व्‍हिएगश यांनी विधानसभेत विचारलेल्‍या लेखी प्रश्‍‍नाला मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्‍या उत्तरातून ही माहिती समोर आलेली आहे.

संजीवनी कारखाना बंद झाल्‍यानंतर गेल्‍या पाच वर्षांत ऊस उत्‍पादक शेतकरी आणि ऊस लागवड क्षेत्रात किती घट झाली? कारखाना बंद झाल्यापासून ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्याशी संबंधित कामगारांना किती आर्थिक मदत देण्‍यात आली?

ऊस उत्‍पादन बंद केलेल्‍या शेतकऱ्यांनी आपल्‍या शेतीत इतर पिकांची लागवड केली का? असे प्रश्‍‍न आमदार व्‍हिएगश यांनी विचारले होते. त्‍यावरील उत्तरात मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी सादर केलेल्‍या आकडेवारीनुसार, २०२०–२१ मध्‍ये राज्‍यातील ६७६ शेतकरी ५४६ हेक्‍टर क्षेत्रात ऊसाची लागवड करीत होते. परंतु, २०२५–२६ शेतकऱ्यांची संख्‍या ४४ टक्‍क्‍यांनी घटून २९८ झाली, तर क्षेत्र २५४.०७ हेक्‍टरवर आल्‍याचे दिसून येते.

नारळ, सुपारीकडे वळले शेतकरी

ज्‍या शेतकऱ्यांनी कारखाना बंद झाल्‍याने ऊसाची लागवड करणे बंद केले, त्‍यांनी गेल्‍या पाच वर्षांमध्‍ये आपापल्‍या शेतीमध्‍ये नारळ, सुपारीसह भाजीपाल्‍याची लागवड करण्‍यास सुरुवात केलेली आहे, असेही मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gen Z Jantar Mantar Protest: ताठर सरकार अन्‌ युवकांचा निर्धार

Mirabai Chanu Weightlifting Gold Medal: मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; CWG 2026 मध्ये भारताला मिळवून दिलं पहिलं 'गोल्ड मेडल' VIDEO

खरी कुजबूज: बोरकर 'त्या' व्हिडिओवर गप्प का?

Horoscope: शिवकृपेने खुलणार यशाचे दरवाजे! 'या' राशींसाठी सोमवार ठरणार अत्यंत शुभ; सुख, समृद्धी सह प्रत्येक कार्यात मिळणार यश

Goa Job Promise Robbery Case: 24 लाखांच्या दरोड्याचा आरोपी पुन्हा गजाआड! 18 वर्षांच्या तरुणाची फसवणूक; कोलवाळ पोलिसांकडून एकाला अटक

SCROLL FOR NEXT