Goa PSI Recruitment Scam Dainik Gomantak
गोवा

Goa PSI Recruitment Scam: उपनिरीक्षक भरती घोटाळा; गृह मंत्रालयाकडून दखल

राज्यात पोलिस उपनिरीक्षकपदाच्या भरतीत गैरव्यवहाराची तक्रार गोवा फॉरवर्ड पक्षाने केली होती. याची केंद्रीय गृह मंत्रालयाने दखल घेतली

दैनिक गोमन्तक

Goa PSI Recruitment Scam: राज्यात पोलिस उपनिरीक्षकपदाच्या भरतीत गैरव्यवहाराची तक्रार गोवा फॉरवर्ड पक्षाने केली होती. याची केंद्रीय गृह मंत्रालयाने दखल घेतली असून या तक्रारींची सखोल चौकशी करावी, अशी सूचना राज्य सरकारच्या सार्वजनिक तक्रार नियंत्रण खात्याला केली आहे.

नियत्रंण खात्याने पोलिस महासंचालक, दक्षता विभागाकडे ही तक्रार पाठवून याच्या चौकशीचा अहवाल 15 दिवसांत सादर करा, असा आदेश दिला आहे.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले, की गोव्यात उपनिरीक्षक भरती करताना शारीरिक चाचणीत दोघेजण नापास होऊनही त्यांना उत्तीर्ण करण्यात आले होते.

त्याशिवाय आणखी सहाजण जे पोलिस शिपायांसाठी घेतलेल्या परीक्षेत नापास झाले तेच दुसऱ्या दिवशी उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत उत्तम गुणांनी पास झाले होते.

या संदर्भात राज्य सरकारकडे गोवा फॉरवर्ड पक्षाने केलेल्या तक्रारींची दखल न घेतल्याने शेवटी सरदेसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले होते.

आमच्या तक्रारीची गृहमंत्री अमित शहा यांनी दखल घेतल्याने मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या आदेशानुसार होणारी चौकशी डोळ्यांना पाणी लावण्यापुरती असू नये.

यापूर्वी कर्नाटकमध्ये झालेल्य अशाच स्वरुपाच्या घोटाळ्यात दोषींना तुरुंगावास झाला आहे. गोव्यातही तसेच व्हावे. अन्यथा या बाबतीतही आम्ही कर्नाटकच्या मागेच राहू, - विजय सरदेसाई, आमदार, गोवा फॉरवर्ड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT