Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa News : राज्यातील विद्यार्थ्यांनी पत्रकारितेसाठी पुढे यावे : मांद्रेकर

Siolim Student : शिवोलीतील स्वामी समर्थ मठात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

गोमन्तक डिजिटल टीम

शिवोली, राज्यातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण होताच केवळ सरकारी नोकऱ्यांच्या मागे न धावता पत्रकारितेत आपले भवितव्य आजमावून पाहण्याचे आवाहन ज्येष्ठ पत्रकार गिरीश मांद्रेकर यांनी शिवोलीत केले.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवोलीतील स्वामी समर्थ मठात पंचक्रोशीतील दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो, मार्ना-शिवोली पंचायतीचे सरपंच संदेश हडफडकर, उपसरपंच मनोरमा गोवेकर, सडये पंचायतीच्या सरपंच दीपा पेडणेकर, मठाचे संस्थापक नीलेश वेर्णेकर उपस्थित होते.

सर्वप्रथम वेर्णेकर यांनी आयोजित कार्यक्रमाचा आढावा घेतला तसेच सभागृहात उपस्थित विद्यार्थी तसेच पालकांचे स्वागत केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संतोष गोवेकर यांनी तर वेर्णेकर यांनी आभार मानले.

सामाजिक उपक्रम राबवावेत

कार्यक्रमात अल्पवेळ उपस्थित असलेल्या शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी राज्यातील मंदिरे- मस्जिद तसेच चर्चमध्ये केवळ धार्मिक उत्सव साजरे करण्याबरोबरच सामाजिक कार्यक्रम तसेच उपक्रमांचे आयोजन करणे काळाची गरज बनली असून समाजमन त्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT