Goa stray dog problem solution Dainik Gomantak
गोवा

Stray Dogs Goa: 'डॉग शेल्टर' होमसाठी सरकार कोर्टावर अवलंबून! मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची माहिती

Goa stray dogs shelter: न्‍यायालयाकडून तसे आदेश प्राप्‍त झाल्‍यानंतर भटक्‍या कुत्र्यांसाठी शेल्‍टर होम आणि साधनसुविधा उभारण्‍यात येतील, असे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

Sameer Panditrao

पणजी: भटक्‍या कुत्र्यांना शेल्‍टर होममध्‍ये ठेवण्‍याचे आदेश उच्च न्‍यायालयाने दिल्‍यास सरकार त्‍यासंदर्भातील पुढील कृती सुरू करेल. न्‍यायालयाकडून तसे आदेश प्राप्‍त झाल्‍यानंतर भटक्‍या कुत्र्यांसाठी शेल्‍टर होम आणि इतर साधनसुविधा उभारण्‍यात येतील, असे पशुपालन आणि पशुसंधर्वन खात्‍याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

दिल्लीतील भटक्‍या कुत्र्यांना तत्‍काळ शेल्‍टर होममध्‍ये ठेवण्‍याचे आदेश काहीच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्‍यायालयाने दिले. त्‍यामुळे गोव्‍यासह देशभर वाढत असलेल्‍या भटक्‍या कुत्र्यांचा विषय ऐरणीवर आलेला आहे.

या पार्श्वभूमीवर, पत्रकारांनी सोमवारी मंत्री हळर्णकर यांना छेडले असता, उच्च न्‍यायालयाने राज्‍य सरकारला आदेश दिल्‍यास भटक्‍या कुत्र्यांना शेल्‍टर होममध्‍ये ठेवण्‍याची प्रक्रिया सुरू करण्‍यात येईल. न्‍यायालयाच्‍या आदेशानंतरच त्‍यासंदर्भातील साधनसुविधा उभारण्‍यात येतील, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

नियंत्रणाची गरज!

गोव्‍यात गेल्‍या काही वर्षांपासून भटक्‍या कुत्र्यांनी उच्‍छाद मांडलेला आहे. स्‍थानिकांसह किनारी भागांत पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांवरही भटक्‍या कुत्र्यांकडून हल्ले होत आहेत. काहीच महिन्‍यांपूर्वी फोंड्यात एका मुलीवर भटक्‍या कुत्र्यांनी हल्ला चढवला. त्‍यात तिचा मृत्‍यूही झाला होता. राज्‍यात वाढत असलेल्‍या अशा घटना रोखण्‍यासाठी भटक्‍या कुत्र्यांवर वेळीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अशी मागणी स्‍थानिकांकडून वाढत आहे. नुकत्‍याच झालेल्‍या विधानसभेच्‍या पावसाळी अधिवेशनात आमदार मायकल लोबो यांनीही भटक्‍या कुत्र्यांचा विषय सभागृहात उपस्‍थित केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Gas Cylinder Refilling: गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड, साळगावात 164 सिलिंडर जप्त; पाचजण ताब्यात

Melvin Noronha: गोमंतकीय डिझायनरचे यश! मरियन-लक्ष्मीचा आशीर्वाद; टॅन्सी रेणू पालने जिंकले 'राष्ट्रीय वेशभूषे'चे पारितोषिक

Mapusa Electric Shock: 'आमच्या जीवासोबत खेळ!' म्हापसा मार्केटमध्ये एकाला विजेचा धक्का; दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण

Horoscope: शुक्र करणार कर्क राशीत प्रवेश! 'या' 4 राशींना जाणवणार मोठा बदल

Asia Cup: आशिया कप संघाच्या घोषणेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का; हा स्टार फलंदाज जखमी

SCROLL FOR NEXT