
फोंडा: फोंडा भागात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुरूच असून गेल्या आठवड्याभरात पाचजणांना चावे घेतल्यामुळे खळबळ माजली आहे. काल फोंड्याच्या मुख्य भागात हॉटेल कॅफे भोसले परिसरात या भटक्या कुत्र्यांनी दोघांचे चावे घेतले.
फोंडा शहर भागात एका लहान पाच वर्षीय मुलासह सुमारे चाळीस वर्षीय व्यक्तीचा कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे बऱ्याच लोकांनी कुत्र्यांच्या दहशतीमुळे या रस्त्यावरून जाणे सोडून दिले आहे. अचानक मागे धावत येऊन हे कुत्रे हल्ला करून चावे घेत असल्याने लोक भयभीत झाले आहेत.
काल एक पाच वर्षीय मुलगा आपल्या आईसोबत या रस्त्याने चालत जाताना अचानक एका कुत्र्याने धावत येऊन या मुलाचा चावा घेतला, तर त्यानंतर तेथून दुचाकीवरून आलेल्या एका चाळीस वर्षीय दुचाकीस्वाराचा पाठलाग करून याच कुत्र्यांनी चावा घेतला.
यापूर्वी फोंडा भागात अंत्रुजनगर, शांतीनगर तसेच हवेली भागात शाळकरी मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतल्याने लोक खवळले आहेत. या भटक्या कुत्र्यांना जागोजागी जेवण वाढण्याचे प्रकार काही श्वानप्रेमींकडून होत असल्याने या भटक्या कुत्र्यांचे फावले असून सरकारी यंत्रणेने त्वरित दखल घेऊन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
कुत्र्यांनी चावे घेतल्याने फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात महिन्याभरात साधारण ८० ते ९० जणांवर, तर खासगी दवाखान्यात साधारण १० ते १५ जणांवर उपचार केले जात आहेत. कुत्र्यांच्या दहशतीमुळे सगळे भयॅलागत असल्याने अपघातांचे सत्रच सध्या सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.