Goa Stray Cattle Issue Dainik Gomantak
गोवा

Stray Cattles: ....तर शेतकऱ्यांना अनुदान परत करावे लागणार; भटक्या गुरांसंदर्भात सरकारने उचलली कठोर पावले

Goa Stray Cattle: जी गुरे कामधेनू किंवा पशुपालन योजनेअंतर्गत घेण्यात आली आहेत, त्यांना सर्व अनुदान पुन्हा द्यावे लागेल व या योजनांचा लाभ पुन्हा घेता येणार नाही

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात भटक्या जनावरांच्या संख्येत वाढ होत असून या गुरांमुळे वाहतुकीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. रस्त्यात गुरे आल्याने मोठ्या प्रमाणात अपघातही होतात. अनेक अपघातांत वाहन चालकांना आपले प्राण देखील गमाववे लागले आहेत.

त्यामुळे सरकारने कठोर पावले उचलत यापुढे जर कुणा शेतकऱ्याची गुरे रस्त्यावर आढळल्यास ती संबंधित अधिकाऱ्यांद्वारे जप्त केली जातील. तसेच विविध सरकारी योजनांद्वारे मिळालेली सवलतही काढून घेण्यात येईल, भविष्यात त्याला योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे पशुसंवर्धन खात्याने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

अनेक शेतकरी आपली गुरे चरण्यासाठी मोकळी सोडतात. अनेकदा ही गुरे रस्त्यावर येतात व अपघाताला कारण ठरतात. जी गुरे कामधेनू किंवा पशुपालन योजनेअंतर्गत घेण्यात आली आहेत, त्यांना सर्व अनुदान पुन्हा द्यावे लागेल व या योजनांचा लाभ पुन्हा घेता येणार नाही. तसेच ज्याला शेतकरी दूध प्रोत्साहनपर साहाय्य मिळते तसेच उपकरणे मिळाली आहेत अशा शेतकऱ्यांची गुरे रस्त्यावर आढळली तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. अशांना पुन्हा या योजनांचा लाभ घेता येणार नसल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

गोमंतक गोवंश संवर्धन योजना अधिसूचित

राज्यातील स्थानिक गोवंश- श्‍वेत कपिला व इतर स्थानिक जातींच्या गुरांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने सरकारने गोमंतक गोवंश संवर्धन योजना अधिसूचित केली असून या योजनेअंतर्गत स्थानिक गोवंशाचा सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्याला एका गायीमागे प्रतिदिन ८० रुपये मिळणार देण्यात येणार आहेत. ही योजना आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून लागू होणार आहे, असे पशुसंवर्धन खात्याद्वारे प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. या योजनेतील रक्कम तीन महिन्यातून एकदा देण्यात येईल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने आपल्या गोठ्यात चारा पाणी योग्य पद्धतीने देऊन गुरांची निगा राखावी लागेल. जर ही गुरे मोकळी आढळली, तर ही योजना रद्द करण्यात येईल. या योजनेअंतर्गत एक कुटुंब कमाल पाच स्थानिक जातीच्या गायींचे संवर्धन करू शकतो. या योजनेतील गायींच्या कानाला मायक्रोचीप किंवा नोंदणीचा बिल्ला असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT