Goa: Local vendors lodge grievances with Dicholi Municipal Corporation Chief Kabir Shirgaonkar. Dainik Gomantak
गोवा

Goa: डिचोलीत परप्रांतीय विक्रेत्यांच्या दादागिरी रोखू

मुख्याधिकारी शिरगावकर यांच्याकडे मांडली कैफियत (Goa)

Sandeep Survekamble

डिचोली पालिका (Bicholmi Multiparty) बाजारात यापुढे शिस्त आणताना परप्रांतीय विक्रेत्यांची अरेरावी किंवा दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा डिचोली पालिकेचे मुख्याधिकारी (Chief Officer) कबीर शिरगावकर यांनी दिला आहे. सरकारी प्रशासनाने (Government Administration) अनुमती दिल्याशिवाय आठवडी बाजार सुरू करण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. काल (बुधवारी) आठवडी बाजाराच्या दिवशी बाजारात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पालिका बाजारातील पारंपरिक महिला भाजी विक्रेत्यांचे (Local vendors)गाऱ्हाणे ऐकून घेतल्यानंतर मुख्याधिकारी शिरगावकर हा इशारा दिला. रोहिणी धाटकर यांच्या नेतृत्वाखालील बाजारातील पारंपरिक भाजी विक्रेत्यांनी गुरुवारी दुपारी डिचोली पालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर यांची पालिकेत भेट घेऊन त्यांच्यासमोर कैफियत (Apologies) मांडली.

राज्याबाहेरील विक्रेत्यांची विशेष करून आठवडी बाजाराच्या दिवशी दादागिरी वाढली आहे. हे विक्रेते बाजार तसेच पदपथ व्यापून व्यवसाय करतात. यामुळे स्थानिकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे, अशी कैफियत बाजारातील पारंपरिक विक्रेत्यांनी मांडली. या विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी या विक्रेत्यांना सकारात्मक आश्वासन दिले. मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतलेल्या विक्रेत्यांमध्ये आनंदी जल्मी, मंगल चिमुलकर, रेश्मा मयेकर, प्रिती नाईक, बेबी गावस, सालेलकर आदी विक्रेत्यांचा समावेश होता.

अनुमती नसतानाही काल बहुतेक परप्रांतीय विक्रेत्यांनी आठवडी बाजारात आपला व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी या विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यास गेलेल्या मार्केट निरीक्षकांशी या विक्रेत्यांनी हुज्जत घातली. एक विक्रेता तर मार्केट निरीक्षकांच्या अंगावर धावून गेला, अशी तक्रार भेट घेतलेल्या पारंपरिक विक्रेत्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली. त्यावेळी मुख्याधिकारी शिरगावकर यांनी मार्केट निरीक्षकांना आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. अधिकारांचा योग्य वापर करा. ज्या विक्रेत्याने अधिकाऱ्यांशी हुज्जत घातलीय तो विक्रेता यापुढे बाजारात बसलेला दिसता कामा नये, असे मुख्याधिकाऱ्यांनी मार्केट निरीक्षकांना सुनावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT