Goa: मुरगाव हिंदू समाजातर्फे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा सत्कार

गोव्यातील जनतेचे प्रेम सदैव आपल्यासोबत असल्याचा विश्वास (Goa)
Governor Rajendra Arlekar felicitated Narayan Bandekar, President of Mormugoa Hindu Samaj
Governor Rajendra Arlekar felicitated Narayan Bandekar, President of Mormugoa Hindu SamajDainik Gomantak

माझ्या आई वडीलांनी माझ्यावर केलेल्या संस्कारामुळेच मी राज्यपाल पदापर्यंत (Governor) पोहोचू शकलो. त्यांनीं दिलेल्या संस्कारातूनच माझ्यात लहानपणापासूनच राष्ट्रीय प्रेम (Patriotism) निर्माण झाले. तसेच वास्कोबरोबरच गोव्यातील नागरिकांनी (Citizens of Goa) माझ्यावर अतूट प्रेम दाखवलेले असून भविष्यातही गोवेकरांचे प्रेम माझ्याबरोबर सदैव राहणार, असा मला पूर्ण विश्वास असल्याचे हिमाचल प्रदेशचे राज्यापाल राजेंद्र आर्लेकर (HP Governor Rajendra Arlekar) यांनी सत्कारावेळी मत व्यक्त केले. (Goa)

Governor Rajendra Arlekar felicitated Narayan Bandekar, President of Mormugoa Hindu Samaj
Goa Election: भाजप जोमात; कॉंग्रेस कोमात

राजेंद्र आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदी निवड झाल्याने मुरगाव हिंदू समाजातर्फे त्यांच्या सत्कार करण्यात आला. येथील हाॅटेल एचक्यू मध्ये आयोजित सत्कार सोहळ्यात यावेळी व्यासपीठावर राज्यपाल आर्लेकर यांच्यासह मुरगाव हिंदू समाजाचे अध्यक्ष नारायण (नाना) बांदेकर उपस्थित होते. तसेच या सोहळ्याला सौ.अनघा आर्लेकर, पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो, कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना, वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, माजी महसूलमंत्री जुझे फीलीप डीसोझा, मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, उपनगराध्यक्षा श्रद्धा महाले, चिखलीचे सरपंच सेबी परेरा, उपसरपंच कमला प्रसाद यादव, नगरसेवक शमी साळकर, उद्योजक प्रशांत जोशी, कृष्णा साळकर तसेच वास्कोतील अनेक नामांकित मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

Governor Rajendra Arlekar felicitated Narayan Bandekar, President of Mormugoa Hindu Samaj
पेडणे पाटो रस्त्याची चाळण

यावेळी पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो, आमदार एलिना साल्ढाना, आमदार कार्लुस आल्मेदा, माजी मंत्री जुझे फिलीप डीसोझा, वामन चोडणकर, एड राजू ढवळीकर इत्यादींनी आर्लेकर यांच्या जीवनावर आधारित भाष्य केले. तसेच राजकीय क्षेत्रात उत्तम कार्याबद्दल माहिती देऊन त्यांना राज्यपाल म्हणून भविष्यातील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. मुरगाव हिंदू समाजाच्या वतीने अध्यक्ष नारायण बांदेकर यांनी प्रास्ताविक केले. तसेच त्यांच्या हस्ते राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा सत्कार करण्यात आला.

Governor Rajendra Arlekar felicitated Narayan Bandekar, President of Mormugoa Hindu Samaj
गोव्यात वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात शिवसेनेचा जाहीर निषेध

पुढे बोलताना श्री आर्लेकर म्हणाले की, वास्कोतील बहुतेक नागरिकांनी मला विद्यार्थी असल्यापासून राज्यपाल होईपर्यंत पाहिलेले असल्याचे सांगून सर्वांच्या आशीर्वाद व प्रेमामुळेच मी आज यश गाठू शकल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यासारखेच हिमाचल प्रदेशातील नागरिक एकदम शांत स्वभावाचे, मैत्रित्वाचे नाते जोडणारे लोक असून गोवा व हिमाचल प्रदेशाच्या लोकांचे मी संबंध आणखीन जास्त जवळ आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com