The trees were cut down and stolen in Goa Premanand Naik / Dainik Gomantak
गोवा

Goa: मुरमुणे सत्तरी येथे खैरीच्या झाडांची कत्तल करुन चोरी

वनखात्याने तात्काळ चोरीचा शोध घेण्याची मागणी (Goa)

Premanand Naik

गुळेली (Guleli) ग्रामपंचायत क्षेत्रातील मुरमुणे (Murmunem) येथे काही अज्ञातांनी (Unknown Person) रस्त्याशेजारी असलेली खैरीची झाडे (Khair Trees) कापून नेण्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार रद्द करण्यात आलेल्या गुळेली आयआयटी (Guleli IIT) जागा ज्या मूरमुणे या ठिकाणाहून सुरु होते त्या ठिकाणी या खैरीच्या झाडांची कत्तल केली आहे. झाड मुळासकट कापून नेले असून बाजूला फक्त फांद्या टाकल्या आहे.आज सकाळी या भागातून प्रवास करताना सदर प्रकार नागरीकांच्या दृष्टीस पडला.

मेळावली ग्राम बचाव अभियानचे समन्वयक शशीकांत सावर्डेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार खैरीची ही झाडे बरीच मोठी आहेत. रात्रीच्या अधांरात हे अज्ञातानी केलेले कार्य याचा आम्ही निषेध करतो. त्याबरोबर वनखात्याने तात्काळ पावले उचलून या चोरीचा शोध घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली.

मेळावली ग्राम बचाव आंदोलन समितीच्या वतीने आम्ही मेळावली भागातील वनराईचे आय आय टी विरोधात प्राणपणाणे रक्षण केले आहे त्याची अशी कत्तल होताना आम्ही पाहू शकत नाही. वनखात्याने आता या भागात गस्त वाढवणे जरुरीचे असल्याचे त्यांनी सांगितले. सदर भाग हा सस्त्यालगत असलेल्या मध्यरात्री कुणी अज्ञातांनी हे काम केले असल्याचे बोलले जाते.बाजारभावात खैरीच्या झाडांना मोठी मागणी असल्याने अशा प्रकारे हे कृत्य केले असल्याचे बोलले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT