Goa Rain Updates Dainik Gomanatak
गोवा

Goa Rain Updates: राज्यात आजपासून पावसाची विश्रांती

आंध्रप्रदेशात मोठया प्रमाणात वादळी पावसाने हजेरी लावली. त्याचा हा परिणाम गोव्यातही होत आहे

दैनिक गोमन्तक

पणजी : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे काही काळ तुरळक सरींनी (Rain) हजेरी लावली. तर काही ठिकाणी मोठ्या सरी कोसळल्या. आज गुरुवारपासून राज्यात पाऊस विश्रांती घेणार असल्याचे हवामान वेधशाळेने (IMD Goa) म्हटले आहे. गोवा राज्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यात सरासरी 185 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या दोन दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, पावसाने बऱ्यापैकी दिलासा दिला आहे. केवळ 12.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हवामान बदलत असल्याने कोणत्याही क्षणी अलर्ट जारी केला जाऊ शकतो. पण, सध्यातरी अरबी समुद्रातील हालचाली मंदावल्‍या आहेत. आंध्रप्रदेशात मोठया प्रमाणात वादळी पावसाने हजेरी लावली. त्याचा हा परिणाम गोव्यातही होत आहे, असे गोवा हवामान विभागाने सांगितले आहे.

यंदाच्या हिवाळ्यात थंडीऐवजी पावसाचा अनुभव लोकांना येत आहे. देशात नोव्हेंबरमध्ये 645 वेळा मुसळधार तर 168 वेळा अतिमुसळधार पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्याने दिली. या नोव्हेंबरमध्ये पडलेला गेल्या पाच वर्षांतील विक्रमी पाऊस आहे. त्याचबरोबर, या महिन्यात 11 वेळा अतिवृष्टीची नोंद झाली. गेल्या वर्षीही नोव्हेंबरमध्ये 11 वेळा अतिवृष्टी झाली होती. यातील बहुतेक अतिवृष्टी दक्षिण भारतात झाली होती. अतिवृष्टीमुळे कर्नाटकात 15 आणि केरळमध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. आणि आता या अतिवृष्टीमुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांत अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT