goa statehood day 30 may 1987 Dainik Gomantak
गोवा

Goa Statehood Day: 451 वर्षांची जुलुमी राजवट, केंद्रशासित प्रदेश ते घटक राज्य; 'गोव्याचा गौरवशाली' प्रवास कसा होता?

Goa state formation significance: ३० मे १९८७ रोजी गोव्याला भारतीय राज्याचा दर्जा मिळाला आणि तेव्हापासून हा दिवस गोव्याच्या जनतेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस ठरला

Akshata Chhatre

Goa Statehood Day History

भारताच्या किनारपट्टीवरील नयनरम्य आणि ऐतिहासिक राज्य म्हणजे गोवा, ज्याला अनेकदा पश्चिमेकडील स्वर्ग असंही म्हटलं जातं. ३० मे १९८७ रोजी गोव्याला भारताचे २५ वे राज्य म्हणून दर्जा मिळाला आणि तेव्हापासून हा दिवस गोव्याच्या जनतेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा, अभिमानास्पद आणि ऐतिहासिक दिवस ठरलाय. यंदा गोवा राज्य दिवसाची ३८ वर्ष पूर्ण करत आहे. कसा होता हा प्रवास?

दीर्घकालीन वसाहतवादी राजवटीचा अंत

गोव्यावर विविध राजवटींचे राज्य केल्याचे पाहायला मिळते. कदंब राजघराणं, बहामनी राज्य, विजयनगर साम्राज्य आणि अखेर पोर्तुगीज राजवट अशा अनेक सत्तांनी गोव्यावर राज्य केलं.

१५१० मध्ये पोर्तुगीज अधिकारी अफोन्सो दि अल्बुकर्कने गोवा जिंकला आणि त्यानंतर तब्बल ४५१ वर्षे गोवा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली राहिला. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही १४ वर्षे गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातच होता.

ऑपरेशन विजय आणि स्वातंत्र्याचा नवा अध्याय

१९ डिसेंबर १९६१ रोजी भारताने 'ऑपरेशन विजय' लष्करी मोहीम सुरू केली आणि गोवा, दमण आणि दीव यांना भारतीय संघराज्यात यशस्वीपणे समाविष्ट करून घेतलं हा दिवस आता 'गोवा मुक्ती दिन' म्हणून साजरा केला जातो. गोव्याचे भारतात विलीनीकरण झाल्यानंतर, दमण आणि दीवसह गोव्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.

राज्याचा दर्जा मिळवण्याचा संघर्ष

गोव्याच्या जनतेने आपली अनोखी संस्कृती, भाषा आणि राजकीय ओळख जपण्यासाठी सातत्याने पूर्ण राज्याच्या दर्जाची मागणी केली. ३० मे १९८७ च्या त्यांचा हा संघर्ष अखेर यशस्वी झाला. या दिवशी भारत सरकारने अधिकृतपणे गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिला आणि गोवा भारताचे २५ वं राज्य झालं, यावेळी दमण आणि दीवला वेगळ्या केंद्रशासित प्रदेशचा दर्जा देण्यात आला.

ओळख, संघर्ष आणि अभिमानाचं प्रतीक

गोवा राज्य स्थापना दिन हा गोव्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक ओळखीचं प्रतीक आहे. पोर्तुगीज राजवटीतून बाहेर पडून भारतीय लोकशाहीच्या चौकटीत स्वतःचा लोकशाही दर्जा प्राप्त करण्यापर्यंतचा गोव्याचा हा प्रवास आहे. हा दिवस गोव्याच्या जनतेच्या संघर्षाचं, त्यागाचं आणि अभिमानाचं प्रतीक आहे. गोव्याच्या जनतेने आपल्या हक्कासाठी आणि ओळखीसाठी केलेल्या संघर्षाचा हा दिवस कायमच गोमंतवासीयांसाठी महत्वाचा राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar: जेल की बेल? काणकोणकर हल्लाप्रकरणी 8 संशयित न्यायालयात होणार हजर; प्रकरणाची ठरणार दिशा

पाहताक्षणी विजयनगर साम्राज्याच्या प्रेमात पडला होता पोर्तुगीज व्यापारी; वाचा 400 वर्षापूर्वीचे प्रवास वर्णन

Rashi Bhavishya 26 September 2025: कुटुंबात सौख्य वाढेल, प्रेमसंबंधात गोडवा; परदेशातून शुभवार्ता येणार

Jasprit Bumrah: आधीही चुकीचा होतास आत्ताही! रोहित-सूर्याच्या कप्तानीखाली गोलंदाजीची तुलना करणाऱ्या कैफला बुमराहने दिलं सडेतोड उत्तर

Sudin Dhavalikar: '..जाल्यार फर्मागुडी जातले शिक्षणिक हब'; वीजमंत्री ढवळीकर Video

SCROLL FOR NEXT