समुद्राच्या उंच लाटा आणि वाऱ्याच्या वेगाची भीती सर्वांनाच वाटत असते. सहसा कुणी या लांटांशी दोस्ती करायला जात नाही. पण काहींना प्रवाहाच्या विरूद्ध पोहोयला आवडते. अशीच एक गोमंतकीय कन्या ‘कात्या कुएल्हो’ बद्दल जाणून घेऊया.
कळंगूट ला वास्तयव्यास असलेली २४ वर्षीय कात्या ला लहानपणापासूनच समुद्राचे वेड. तिचे वडील स्वतः सागरी नौकायन (विंड सर्फिंग) करत असल्याने लहान असल्यापासून आईसोबत त्यांचा होणाऱ्या स्पर्धा बघायला ती दर आठवड्याला जायची.
वडिलांमुळेच तिला आणि तिच्या भावाला या खेळाची आवड निर्माण झाली. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पोहायला शिकल्याने तिला पाण्याची कधीच भीती वाटली नाही. अकराव्या वर्षी तिच्या वडिलांनी तिला पहिल्यांदा सर्फिंग बोटवर उभं राहायला शिकवलं.
स्वभावाने शांत असलेल्या कात्या चे शाळेत जास्ती मित्रमैत्रिणी नव्हते म्हणून ती नेमक्या कुठल्या खेळात भाग घेते हे तिच्या जवळच्या व्यक्तिंनाच ठाऊक होते. त्यावेळी अशा खेळाबद्दलची माहिती कुणाला नव्हती असे कात्या सांगते.
शालेय जीवनात अभ्यास आणि सराव दोन्ही सांभाळणे कठीण होते. शाळेमध्ये मी 'हेडगर्ल' असल्याने तिसुद्धा जबाबदारी महत्वाची होती. सकाळी जिम मधून शाळेत जाणे आणि ती सुटल्यावर दुपारी सरावाला जाणे यामध्ये आपली खूप दमछाक व्हायची असा अनुभव कात्याने सांगितला.
आपला सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाचा डबा सोबत घेऊनच आपण सकाळी बाहेर पडायचे. शाळेत गेल्यावर नाश्ता केला की दुपारी भाऊ सरावासाठी न्यायला यायचा तेव्हा त्याचसोबत गाडीतच जेवण कारायचे. अशाप्रकारे सकाळी घर सोडले की ते एकदम संध्याकाळी दिसायचं असेही पुढे ती म्हणाली.
काळजीपोटी सुरवातीला आई मला या खेळात पाठवायला तयार नव्हती. कारण हा खेळ जेवढा मनोरंजक तेवढाच खूप धोकादायक आहे. पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असलेल्या ह्या खेळात कधी काय होईल संगता येत नाही. सर्व काही पाण्यावर आणि हवेच्या वेगावर अवलंबून असते.
पण आता तीचा संपुर्ण पाठिंबा आहे. आम्ही स्पर्धेत उतरल्यावर त्याचा निकाल काय लागला हे सतत ती आपल्या वडिलांना विचारात असते. आमच्या स्पर्धा बघायला तिला खूप आवडते अशाप्रकारच्या बालपणीच्या आठवणी कात्याने सांगितल्या.
माझे वडिलचं माझे गुरु असल्याने स्वतःला मी खूप भाग्यवान समजते. त्यामुळे वेगळ्या प्रशिक्षकाचा खर्च मला येत नाही आणि सराव देखील खेळीमेळीत होतो. पण जेव्हा कधी संधि मिळते तेव्हा आपण परदेशात जाऊन ऑलिंपिक स्तरावरच्या प्रशिक्षकांकडून सराव करून घेते.
ह्या खेळाचे साहित्य खूप महागडे आहे आणि भारतात ते उपलब्ध होत नाही. वेगवेगळ्या एजन्सिकडून मागवावे लागते. महिलांसाठीचे साहित्य जवळपास ७ लाख तर पुरुषांसाठीचे ८ लाख एवढी किंमत असते. वडिलांनी स्वखर्चाने हे साहित्य आम्हाला घेऊन दिले आहेत असे कात्याने सांगितले.
आज वाडिलांचा पाठिंबा आणि प्रोत्साहनामुळे ती आणि तिचा भाऊ आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन नाव कामवू शकले असे कात्या सांगते. नाहीतर परदेशातील प्रशिक्षक एक दिवसाचे १०० ते २०० युरो एवढी फी आकारतात जी सहसा सर्वसामांन्यांना परवडत नाही.
कात्याच्या दिवसाची सुरवात ही पहाटे व्यायामशाळेत होते. जेव्हा तिच्या स्पर्धा नसतात तेव्हा तिला पुस्तक वाचणे, संगीत एकणे आवडते. ती स्वतः एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर आहे आणि फावल्या वेळेत वेगवेगळ्या कलाकृति करायला तिला आवडतात.
आत्तापर्यंत कात्याने राष्ट्रीय स्तरावर १५ सुवर्ण पदके, आशियाई स्तरावर २ कांस्य पदके तर हल्लीच आय क्यु विंड फोईल या आशियाई स्तरावर झालेल्या यूथ ऑलिंपिक स्पर्धेत तिने १ रौप्य पदक पटकाविले आहे. त्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती एकमेव विंड सर्फर होती.
सागरी नौकायान आणि आय क्यु फोईल मध्ये फक्त साहित्याचा फरक असतो. एरवी सर्फिंग हे समुद्राच्या लाटांवर केले जाते परंतु आय क्यु प्रकारात सर्फिंग बोर्डला असलेल्या कार्बन फोईलमुळे लाटांच्या वरुन जास्ती वेगाने सर्फिंग केली जाते.
कित्येक वेळा असे झाले आहे की माझे नाव बघितल्यावर इतर मुलींनी आपल्या स्पर्धेचे गट बदलून घेतले आहेत. आपल्या सोबत कुणी स्पर्ध्याच करू इच्छित नसल्याने नाईलाजाने आपल्याला खुल्या गटात स्पर्धा करावी लगाली ज्याचा मला फायदाच झाला असे कात्या म्हणते.
सर्फिंग मध्ये संपुर्ण शरीराचा कस लागतो त्यामुळे व्यायामची खूप आवश्यकता असते. खुल्या गटात पुरुषांशी स्पर्धा करताना त्यांच्या वेगाबरोबर स्पर्धा करावी लागत होती. आपण फक्त १७ वर्षाची होते जेव्हा पहिल्यांदा आपण राष्ट्रीय स्तरावर खुल्या गटात विजेतेपद पटकावले.
गोव्यामध्ये दोनापावला येथे असलेला 'हवाई बीच' पदार्पण करणाऱ्या नवीन खेळाडूंसाठी उत्तम आहे कारण तिथे हवेचा वेग आणि उसळणाऱ्या लाटांची ऊंची दोन्ही कमी असते. मी माझ्या करियर ची सुरवात तिथूनच केली आणि अजूनही त्याच ठिकाणी सारावाला जात असल्याचे कात्या म्हणाली.
कात्या आणि तिचा भाऊ दोघेही या खेळात प्रवीण आहे. ती नेहमी भावासोबत सराव करत असल्याने स्पर्धेच्या वेळी इतर महिला स्पर्धकांना हरविणे सोपे जाते असे ती सांगते. कात्याचा भावला सर्फिंग मध्ये ‘योर्टस्मॅन ऑफ द इयर’ किताब मिळालेला आहे.
आपल्या आयुष्यातील सर्वात आवडत्या क्षणांबद्दल कात्या असे सांगते की इटली येथील लेक गार्डा मध्ये १०० लोकांसोबत एकत्र सर्फिंग केले होते आणि २०१८ साली जेव्हा भावासोबत आशियाई स्पर्धेच्या उद्घाटनावेळी केलेल भारताचे प्रतिनिधित्व. या स्पर्धेत आम्ही दोघे एकमेव गोमंतकीय होतो.
गोवा समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखला जातो. आणि सर्फिंग हा प्रकार परदेशी लोकांना जास्ती आकर्षित करतो त्यामुळे जर अशा प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन मिळाले तर पर्यटनालासुद्धा गती मिळेल. पर्यटन मंत्री तसेच क्रीडा मंत्र्यांनी यात लक्ष घालावे अशी विनंती कात्याने केली आहे.
इतर खेळांपेक्षा सर्फिंगमद्धे भारतीयांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप छान कामगिरी केली आहे. पण याबद्दल कुठेच जागरूकता होत नसल्याने या खेळांकडे कोणी पहात नाही. गोव्याला खेळाडूंची खूप गरज आहे. आणि पालकांनी मुलांना यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. लहान वयातच मुलांना मैदानी खेळांची सवय पालकांनी घालून द्यायला हवी. या सर्फिंगमुळे दररोज निसर्गाचा आनंद घेता येतो यात मला समाधान आहे.कात्या कुएल्हो, विंड सर्फर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.