Taxi Meter  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात ॲप आधारित टॅक्सी सेवेला हिरवा कंदील

टॅक्सी सेवेला राज्य सरकारने दिली मंजुरी

दैनिक गोमन्तक

गोव्यात ॲप आधारित टॅक्सी सेवेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांनी एक मताने याला मंजुरी दिली. त्यामुळे याचा फायदा गोव्यात येणाऱ्या लाखो पर्यटकांना होणार आहे. (Goa state government has approved an app-based taxi service in Goa )

गेले काही दिवस राज्यात टॅक्सी सेवा मीटरवरुन अनेक राजकिय चर्चा घडल्या आहेत. यावर बोलताना टॅक्सी सेवेसाठी जाणीवपूर्वक मीटरचा वापर केला जात नाही. असे निरीक्षण गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभा अधिवेशनात नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी आज स्पष्ट केले आहे की, ॲपवर आधारित टॅक्सी सेवेसाठी सर्वांनी समर्थन देणे गरजेचे आहे.

मात्र गोव्यात ॲप आधारित टॅक्सी सेवेला राज्य सरकारने मंजुरीचा निर्णय घेतल्याने याचा उपयोग टॅक्सींचा वापर करताना पर्यंटकांना होणार आहे. त्यामूळे काही ठिकाणी होत असलेली पर्यटकांची लूट थांबण्यास मदत होणार आहे. कारण प्रवासाचे पैसे नेमके झाले किती ? आणि जादा पैसे गेले किती यातील तफावत पर्यटकांना आता समजणार आहे. त्यामूळे हा निर्णय आता गोव्यात येणाऱ्या लाखो पर्यटकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT