पणजी: राज्यात मूत्रपिंड रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढू लागली आहे. याची प्रचिती आज प्रत्यक्ष विधानसभेत आली. बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना राज्यात मूत्रपिंडाच्या वाढत्या रुग्णांबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चिंता व्यक्त केली. (The number of kidney patients has increased in the state of Goa - Chief Minister Dr. Pramod Sawant )
डायलिसिस उपचारासाठी गोमेकॉ आणि खाजगी इस्पितळांत येणाऱ्या रुग्णांमुळे हा प्रकार उघड झाला आहे. यावर आयआयटी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) सहकार्याने संशोधन केले पाहिजे, अशी सूचना मुख्यमंत्री सावंत यांनी आरोग्य खात्याला केली.
काणकोणसारख्या तालुक्यातून आज मोठ्या संख्येने या आजाराचे रुग्ण येत आहेत. त्यासाठी संशोधन करून याचे कारण शोधले पाहिजे. राज्यातील इतर भागांमध्ये देखील मूत्रपिंडाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हे नेमके पाण्यामुळे होत आहे का, किंवा इतर दुसरे कारण आहे, याचा शोध लागल्यास त्याचा फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकारकडून डायलिसिस उपचार मोफत दिला जातो. ज्यांना खासगी इस्पितळात उपचार घ्यायचा असेल, त्यांना केवळ दोन हजार रुपये देऊन उपचार घेण्याची सोय सरकारने केली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
मूत्रपिंड वाढत्या रुग्णांच्या संख्येवर संशोधन केले जाईल. सध्या देशात गोवा एकमेव राज्य आहे, जेथे डायलिसिस उपचार मोफत दिला जातो. अगोदर रुग्णांना इंजेक्शनसाठी पैसे भरावे लागत होते. परंतु, आता गोमेकॉत हा उपचार मोफत केला जातो तर खासगी इस्पितळात त्यासाठी दोन हजार रुपये द्यावे लागतात, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.