Goa Crime News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: स्टोअर रूममध्ये सरकारी अबकारी खात्याच्या कर्मचाऱ्याने संपवले जीवन; कारण अस्पष्ट

Goa Crime News: पोलिसांनी दुपारी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. बुधवारी शवविच्छेदन होणार आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्य सरकारच्या अबकारी खात्यात लिपिक पदावर काम करणारे रुझारिनो फर्नांडिस (५२, रा. हळदोणा) यांचा आज दुपारी खात्याच्या मुख्य इमारतीबाहेरील स्टोअर रूममध्ये मृतदेह आढळला. त्यामुळे अबकारी व राज्य कर खात्याच्या कार्यालयात खळबळ उडाली. गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्याने प्रथमदर्शनी ती आत्महत्या असल्याचे निदर्शनास आले.

मात्र, आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक पोर्तुगीजकालीन इमारतीत स्टोअर रूम तयार केले आहे. या स्टोअर रूमची चावी फर्नांडिस यांच्याकडे असते.

ते नेहमीप्रमाणे आज सकाळी कामावर आले. हजेरी लावल्यानंतर ते स्टोअर रूममध्ये गेले. ज्या विभागात ते बसत होते, तेथील कर्मचाऱ्यांनी फर्नांडिस हे कामावर आलेले असताना ते अजून कसे आले नाहीत म्हणून दुपारी साडेबारा-एकच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला.

मात्र, ते मोबाईल उचलत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी स्टोअर रूममध्ये जाऊन पाहिले असता, त्यांचा गळफास घेतल्याच्या स्थितीत मृतदेह आढळला. पोलिसांनी दुपारी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. बुधवारी शवविच्छेदन होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sankashti Horoscope: गणपतीच्या कृपेने दूर होतील सर्व कष्ट, 'या' राशींना होणार आर्थिक फायदा; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Goa Crime: स्टेशनवर महिलांना लुबाडले, रेल्वेतून दारू तस्करी; पनवेलच्या संशयितावर महाराष्ट्र, कर्नाटकातही गुन्हे नोंद

Goa Fish Prices: मासळी बाजारात गर्दी! इसवण 900, बांगडे 300 रुपये किलो; जाणून घ्या ताजे दर

Goa Live Updates: कुंकळ्ळी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने महाराष्ट्राला गुंडाळले! 36 धावांत पटकावले 5 बळी; गोव्याकडे 22 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT